Tuesday, August 4, 2026
Latest NewsPUNE

सावित्रीबाई फुले पुरस्कार ला स्थायी समितीच्या बैठकीमध्ये मंजुरी – अर्चना पाटील

पुणे:पुणे महानगर पालिकेच्यातीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाने दरवर्षी सावित्रीबाई फुले जयंती निमित्त सावित्रीबाई फुले स्मारक गंज पेठ  येथे व्याख्यानमाला सुरु करण्यात यावी .तसेच महिला शिक्षण क्षेत्रात नेत्र दीपक कामगिरी बजविणार्‍या महिलेस पुणे मनपाच्या वतीने सावित्रीबाई फुले शैक्षणिक पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी नगरसेविका अर्चना पाटील यांनी केली होती.

शहरात वर्षभर विविध साहित्य विषयक संमेलने, व्याख्यानमाला आयोजित केले जात असतात. त्या नुसार स्थायी समितीच्या बैठकीमध्ये
मंजूरी देण्यात आली.
पुणे शहर हे विद्येचे माहेर घर म्हणून देशभरात ओळखले जाते. साक्षरता हया विषयासाठी फुले दाम्पत्य यांनी केलेल्या कार्याचा गौरव इंग्रजांनी पण केला आहे. महिलांनी शिक्षण घेणे हे ज्या सनातनी काळात पाप मानले जायचे त्या काळात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची पुणे शहरात पहिल्यांदा मुहूर्तमेढ रोवली. आज स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात गौरवास्पद कामगिरी बजावत आहेत सर्व सामान्य माहिलेपासून ते देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांनी नेत्रदीपक यश मिळविले आहे याचे सर्व मूळ क्रांतीज्योती सावित्रीबाई तपश्चर्ये मध्ये दडलेले आहे. पुणे शहरात साहित्य, क्रीडा, कला, अभियांत्रिकी, व्यवसाय इ. सर्व क्षेत्रात स्त्रीया पुरुषांच्या बरोबरीने सक्षमतेने कार्यरत आहेत. अशा स्त्रीयांचा गौरव करण्यात यावा. आज सावित्रीबाईंच्या नावाने पुरस्कार सुरु करण्यात येत असल्याचा मला खूप आनंद होत आहे. या पुरस्कारामुळे अनेक महिला सवित्रीबाईंची प्रेरणा घेऊन स्वता; चे आयुष्य घडवतील असे पाटील यांनी सांगितले.

आज स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात गौरवास्पद कामगिरी बजावत आहेत सर्व सामान्य माहिलेपासून ते देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांनी नेत्रदीपक यश मिळविले आहे याचे सर्व मूळ क्रांतीज्योती सावित्रीबाई तपश्चर्ये मध्ये दडलेले आहे. पुणे शहरात साहित्य, क्रीडा, कला, अभियांत्रिकी, व्यवसाय इ. सर्व क्षेत्रात स्त्रीया पुरुषांच्या बरोबरीने सक्षमतेने कार्यरत आहेत. अशा स्त्रीयांचा गौरव करण्यात यावा. आज सावित्रीबाईंच्या नावाने पुरस्कार सुरु करण्यात येत असल्याचा मला खूप आनंद होत आहे. या पुरस्कारामुळे अनेक महिला सवित्रीबाईंची प्रेरणा घेऊन स्वता; चे आयुष्य घडवतील असे पाटील  यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading