fbpx
Friday, April 26, 2024
Latest NewsNATIONALTOP NEWS

भयानक – चिमुकलीवर सावत्र बापाकडून अत्याचार, प्रायव्हेट पार्टमध्ये घातली काठी, पिडीतेची प्रकृती चितांजनक  

रांची : झारखंडची राजधानी असलेल्या रांची शहारात तळापायाची आग मस्तकात जाईल अशी एक भयानक घटना घडली आहे. एका नराधम सावत्र बापाने अवघ्या सहा वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो प्रयत्न अपयशी ठरल्याने त्याने या चिमुकलीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये काठी घातली. या घटनेनंतर गंभीर जखमी झालेल्या पीडितेची प्रकृती चितांजनक असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

टीव्ही 9 ने दिलेल्या बातमी नुसार, पीडितेची आई घरात नसताना या नराधम सावत्र बापाने हे निर्घृण कृत्य केले. हे कृत्य  केल्यानंतरही विव्हळत असलेल्या चिमुकलीवर या बापाला जराही दया आलेली नाही. पीडितेची आई जेव्हा घरी आली तेव्हा तिला जमिनीवर रक्तबंबाळ अवस्थेत मुलगी निपचित पडलेली दिसली. यावेळी सहा वर्षाच्या पीडितेने आपल्यासोबत घडलेला सर्व प्रकार आईला सांगितला. पीडिटेच्या आईने तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. सदर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, फरार असलेल्या सावत्र बापाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली जात आहे. या घटनेमुळे पीडितेची आईचे देहभान हरपले आहे.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading