Wednesday, August 5, 2026
Latest NewsTECHNOLOGY

आयफाल्कनने ४के यूएचडी टीव्ही यू६१ लॉन्च केला

अग्रगण्य इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड आयफाल्कनने उत्कृष्ट डिस्प्लेसह, डॉल्बी ऑडिओ, स्लिम डिझाइन आणि इतर स्मार्ट वैशिष्ट्यांनी सज्ज यू६१ च्या लॉन्चसह यू सीरिज सुरू करीत असल्याची घोषणा केली आहे.

यू६१मध्ये ४३ इंच स्क्रीनमध्ये उपलब्ध आहे. जे वापरकर्त्यांना त्यांचा आवडता टीव्ही शो आणि बरेच काही शोधण्यासाठी त्यांच्या व्हॉइस कमांडचा वापर करण्यास अनुमती देते. केवळ कनेक्टिव्हिटीचा विचार केला तर ४३ इंचाचा टीव्ही ३ एचडीएमआय पोर्ट आणि यूएसबी पोर्टसह येतो. मनोरंजनाच्या चाहत्यांसाठी टीव्ही नेटफ्लिक्स, ॲमेझॉन व्हिडिओ, यूट्यूब सारख्या ॲप्सना समर्थन देतो आणि आपल्याला अमर्याद ऑनलाइन सामग्रीत प्रवेश करण्यास परवानगी देतो.

हा टीव्ही पाहण्याच्या आणि ऑडिओ अनुभवाच्या बाबतीत वापरकर्त्यांना निराश करणार नाही.  ४के एचडीआर डिस्प्ले आणि एचडीआर १०, मायक्रो डिमिंग, ४के अपस्केलिंग, डायनॅमिक कलर एन्हान्समेंट आणि इतर गोष्टींसह हा टीव्ही क्रीडा स्पर्धांचा इमर्सिव्ह आणि सिनेमॅटिक अनुभव देतो.  दरम्यान, या टीव्हीमध्ये डॉल्बी ऑडिओ, २४ डब्ल्यू साऊंड आउटपुट, सराउंड व्हर्च्युएझर आणि अल्ट्रा-रिअॅलिस्टिक, वाढीव ऑडिओ अनुभवासाठी डाऊन-फायरिंग देखील आहे.

टीसीएलच्या स्मार्ट यूआयची उपस्थिती आपल्या घरातील मनोरंजन प्रणालीला एक पाऊल पुढे टाकते तर एआय वैशिष्ट्य केवळ जीवन सोपेच नाही तर बुद्धिमान देखील बनवते. हे आपल्याला आपल्या आवडत्या कार्यक्रमांचा शोध घेण्याचा, त्यांच्याशी संबंधित उत्तरे मिळविण्याचा आणि बरेच काही करण्याचा सर्वात सोपा मार्ग प्रदान करते. आपण व्हॉइस कमांडद्वारे टीव्ही नियंत्रित करू शकता आणि आपली सर्व स्मार्ट होम डिव्हाइस आपल्या टीव्हीशी कनेक्ट करू शकता आणि हा आपल्या घरासाठी आकर्षणाचे केंद्र बिंदु बनेल.

टीसीएल इंडियाचे जनरल मॅनेजर माइक चेन म्हणाले, “आयफाल्कन उत्पादने लोकांना उच्च दर्जाच्या टीव्ही तंत्रज्ञाना समिप आणण्यावर लक्ष केंद्रित करतात. नवीनतम तंत्रज्ञानाच्या आकर्षक डिझाइनसह आयफाल्कन यू६१ परवडणाऱ्या किंमतीच्या श्रेणीत येतो. हा ब्रँड सातत्याने दमदार कामगिरी करणारी उत्पादने विकसित करण्याच्या दिशेने काम करीत आहे. ज्या ग्राहकांना खिशाला झळ न बसता, घरी सिनेमॅटिक अनुभव अनुभवायला आवडेल अशा ग्राहकांसाठी यू६१ ही एक उत्तम निवड आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading