Monday, September 28, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

पुढच्या 4 ते 5 दिवसात राज्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता

पुणे: आजपासून राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय होणार आहे. पुढच्या 4 ते 5 दिवसात राज्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील चार दिवस मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यात मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे. पुढील पाचही दिवस राज्यात हीच परिस्थिती कायम राहणार आहे.

अरबी समुद्रात निर्माण झालेलं शाहीन चक्रीवादळ तीव्र झालं असून त्यानं ओमन देशाच्या किनारपट्टीवर धडकलं आहे. चक्रीवादळ किनापट्टीवर धडकल्यापासून देशात अनेक ठिकाणी पावसानं थैमान घातलं आहे. येथील मस्कटसह अनेक शहरं जलमय झाली असून पूरस्थिती निर्माण झाली आहे.

सध्या बंगालच्या उपसागर आणि परिसरार चक्राकार वारे सक्रिय आहेत. तमिळनाडू किनाऱ्यापासून केरळपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टी ही सक्रिय आहे. त्यामळे दक्षिण भारतासह महाराष्ट्रातील काही भागात जोरदार पाऊस पडेल.
मुंबई-ठाण्यासह कोकण विभागात अनेक ठिकाणी मुसळधार, तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. पुणे, नाशिक, कोल्हापूर, साताऱ्यासह पश्चिाम-मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जवळपास सर्वच ठिकाणी आणि विदर्भातही काही भागांत जोरदार पाऊस होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सध्या पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही पाऊस होत आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading