मोदी सरकारने देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आणली -एच. के. पाटील
पुणे: मोदी सरकार मुळे दोन वर्षात बेरोजगारी ही वाढली आहे. कोरोनाच्या संकटामुळे सगळ्या नागरिकांचे भरपूर हाल झाले आहेत. तरुण वर्ग नोकरीसाठी वणवण फिरत आहे. मोदी सरकारने देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आणली आहे असा आरोप अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्र राज्याचे प्रभारी एच. के. पाटील यांनी आज पत्रकार परिषद मोदी सरकारवर निशाणा साधला.
यावेळी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, पुणे शहर अध्यक्ष रमेश बागवे, माजी आमदार उल्हास पवार, आमदार संजय जगताप , आमदार संग्राम थोपटे, माजी आमदार मोहन जोशी उपस्थित होते.
एच के पाटील म्हणाले अमेझॉन कंपनी मोठया प्रमानात रोजगार निर्माण करणार .थोड्या वर्षा मध्ये अमेझॉन,फिल्पकार्ट सारखा कंपन्या छोट्या दुकानदाराचे व्यवसाय बंद पाडणार .त्यामुळे या कंपन्याना आमचा विरोध आहे. जर ॲमेझॉन, फ्लिपकार्ट यासारख्या कंपन्यांने जर छोटे उद्योग धंदे बंद केले तर जर छोटी दुकाने बंद पडली तरीही मोदी गप्प का ?
असा प्रश्न एच के पाटील यांनी उपस्थित केला.
नाना पटोले म्हणाले, महानगरपालिकेच्या निवडणुकीत राज्य सरकारने तीन प्रभाग रचना हा नवा आदेश काढला आहे . काँग्रेस तीन प्रभाग रचने विरुद्ध कोर्टात जाणार होते. त्यावर नाना पटोले म्हणाले, आमचा तीन प्रभाग रचनेला विरोध नाही येणाऱ्या निवडणुकीत कोण जिंकेल हे समजेल.
मोदी सरकारने जी महागाई बेरोजगारी जी केली आहे त्याविरुद्ध आम्ही अख्या देशभर असंतोष प्रकट सभा व शेतकऱ्यांच्या उसाला एफआरपी व योग्य मालाला भाव द्यावा म्हणून शेतकरी अख्ख्या देशभर आंदोलन करत आहेत. असे नाना पटोले म्हणाले.
