Wednesday, June 17, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

मनसे सोबत युती संदर्भात राज्य पातळीवरचे आमचे नेते निर्णय घेतील – प्रवीण दरेकर

पुणे: राज्यातल्या आगामी महानगरपालिकेच्या व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये मनसे आणि भाजप एकत्र येऊन निवडणुका लढणार अशी चर्चा काही दिवस राज्यभर होती. त्यावर काल राज ठाकरे यांनी  कार्यक्रत्यांना युती बाबत चर्चा करू नका निवडणुकीच्या तयारीला लागा असे आदेश दिले होते.- मनसेसोबत युतीबाबत  भाजपने अद्याप पक्ष पातळीवर केला नाही.यासंदर्भात राज्य पातळीवरचे आमचे नेते निर्णय घेतील अशी माहिती विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

प्रवीण दरेकर आज पुणे दौऱ्यावर आले असता त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. दरेकर म्हणाले, मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या बाबतीत संवेदनशील नाहीत. मागच्या वर्षी प्रमाणे या वर्षी पण पाऊसा मुळे मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आज मराठवाडा पूर्णपणे उध्वस्त झाला आहे.आमची मागणी आहे तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करा.

वडेट्टीवारांनी सांगितले दोन दिवसात मदत करू मात्र अजून मदत नाही.नकी मदत कधी करणार असा ही प्रश्न दरेकर यांनी या वेळी उपस्थित केला.
काही झालं की केंद्रावर ढकलायचं, आतापर्यंत दीड हजार कोटींची मदत केली आहे.पुढची मदत राज्य सरकार कधी करणार हे सरकारला माहीत.आता घोषणा पुरे झाल्यात आता थेट मदत करावी अशी मागणी या वेळी यावेळी त्यांनी केली.
येत्या दोन दिवसात देवेंद्र फडणवीस मराठवाड्याचा दौरा करणार अशी माहिती प्रवीण दरेकर यांनी दिली.
महानगरपालिकेच्या निवडणुकीत राज्य सरकारने तीन प्रभाग रचना हा नवा आदेश काढला आहे.त्यामुळे काही पक्ष नाराज झाले होते काही नेते  कोर्टात केस दाखल करणार होते. पण मागच्या आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत आम्ही याचा फेरविचार करू असे सांगितले होते पण कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर काहीच निर्णय झाला नाही त्यावर दरेकर म्हणाले.त्रिसदस्यीय प्रभाग पद्धतीचा भाजपला फायदा असे सांगत ठाकरे सरकारला टोला लगावला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading