Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

चार दिवसीय ‘घे भरारी’ प्रदर्शनाचे उद्घाटन

  • तीन ऑक्टोबरपर्यंत सकाळी ११ ते रात्री ९ या वेळेत सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार

पुणे : व्यावसायिकांनी व्यावसायिकांसाठी चालवलेल्या ‘घे भरारी’ फेसबुक ग्रुपच्या वतीने आयोजित चार दिवसीय ‘घे भरारी’ प्रदर्शनाचे उद्घाटन गुरुवारी झाले. छोटे व्यावसायिक, बचत गटातील महिला, घरगुती व्यवसाय उभारणाऱ्या लोकांना व्यासपीठ देण्याच्या उद्देशाने हे प्रदर्शन आयोजिले आहे.

बावधन येथील सूर्यदत्ता कॉलेजच्या मैदानावर तीन ऑक्टोबर २०२१ पर्यंत रोज सकाळी ११ ते रात्री ९ या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे. बावधन येथील नगरसेवक किरण दगडे पाटील व बावधनच्या सरपंच पियुषा दगडे पाटील यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. संयोजिका नीलम उमराणी-एदलाबादकर, राहुल कुलकर्णी यावेळी उपस्थित होते.

किरण दगडे पाटील म्हणाले, “कोरोनानंतर आणि सणासुदीच्या तोंडावर भरलेले हे प्रदर्शन बावधनकरांसाठीच नव्हे, तर सर्व पुणेकरांसाठी उपयुक्त आहे. दर्जेदार, कलाकुसरीतून साकारलेल्या आणि उपयोगी अशा वस्तू एकाच छताखाली उपलब्ध झाल्या आहेत. यातून या नवउद्योजकांना हातभार लागणार आहे. अशा प्रदर्शनातून त्यांना पुन्हा जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळेल.”

नीलम उमराणी-एदलाबादकर म्हणाल्या, “गृहसजावटीच्या वस्तू, हस्तकला, रेडिमेड पदार्थ, कोकणी पदार्थ, डिझायनर ड्रेसेस, हर्बल प्रॉडक्ट्स, आयुर्वेदिक औषधे, घरगुती अत्तरे, धारवाडी खणातील दागिने, ऍक्रॅलिक फिफ्ट्स, लाईट वेट पर्स, चंदेरी-कलमकारी साड्या, नक्षीकामातील ओढण्या आदी वस्तू, वेगवेगळी सरबते, नाचणी, तीळ, शेंगदाण्याचे लाडू, उपवास खाकरा असे पदार्थ, लहानांसाठी खेळण्यांचे असे १०० पेक्षा अधिक स्टॉल आहेत.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading