Saturday, June 20, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा

पुणे:बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार ते अतिमुसळधार पावासाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे सात जिल्ह्यांना अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
राज्यातील पालघर, ठाणे, मुंबई, नाशिक, अहमदनगर, धुळे, रायगड या जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आला असून पुढील ३ ते ४ तासांत अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

आज पालघर, नाशिक, औरंगाबाद, जालना आणि जळगाव  या पाच जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर पुण्यासह मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, नंदुरबार आणि धुळे या पंधरा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. संबंधित जिल्ह्यात पुढील काही तासांत विजांच्या कडकडाटासह वेगवान वाऱ्याच्या साथीने मुसळधार ते  अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा देखील दिला आहे. तर गोंदिया भंडारा आणि गडचिरोली ही तीन जिल्हे वगळता उर्वरित राज्यात आज येलो अलर्ट देण्यात आला आहे.
हवामान विभागाने मुंबईमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे. ज्यामुळे मुंबईत विजांच्या कडकडाटासह, वेगवान वारे वाहणार आहे. तर वादळजन्य परिस्थिती निर्माण होत वेगवेगळ्या ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
तसेच मुंबईमध्ये पुढील ३-४ तास मुसळधार पाऊस असेल. त्यामुळे घराबाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading