Sunday, August 2, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

धक्कादायक : पुराच्या पाण्यात एसटी गेली वाहून, एकाचा मृत्यू

यवतमाळ : पुराच्या पाण्यात एसटी गेली वाहून गेल्याची धक्कादायक घटना यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथील दहागाव जवळ आज सकाळी घडली. या घटनेत एका प्रवाशांचा मृत्यू झाला असून दोन प्रवाश्यांचा शोध सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही एसटी उमरखेडवरून पुसदला जात होती. या एसटीमध्ये चालक व वाहकासह सहा प्रवासी  होते. काल रात्री झालेल्या मुसळधार पावसाने दहागावच्या पुलावर पाणी आले होते. असे असताना देखील एसटी चालकाने अती धाडस करून एसटी पाण्यातून पुढे दामटण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाण्याचा अंदाज येण्या आगोदरच पावसाच्या पाण्यात एसटी वाहून गेली. प्रसंगावधान राखून स्थानिकांनी प्रवाशांना वाकवण्याचा प्रयत्न केला. यावेळी एसटी चालक वाहक यांसह काही प्रवाश्यांनी एसटीच्या टपाचा आधार घेत जीव वाचवला. या घटनेत एका प्रवाश्याचा मृत्यू झाला असून दोन प्रवाश्यांचा शोध सुरू आहे.

दरम्यान, घटनास्थळी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी भेट दिली असून बचाव पथकाने शोधमोहीम सुरु केली आहे. पुलावर पाणी असल्यास वाहतूक करु नये असं सातत्याने आवाहन करण्यात येत होते. मात्र एसटी चालकाने या आवाहनाकडे दुर्लक्ष करून नाल्याच्या दोन्ही दिशेला पाणी असताना देखील प्रवसशयांचे जीव धोक्यात घातले.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading