महिलांवरील वाढत्या अन्याय – अत्याचार विरोधात पुणेकर महिलांचे जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश आंदोलन
पुणे : सद्ध्या महिलावर वाढत असलेले अन्याय अत्याचाराचा निषेध करण्यासाठी पुणे शहरातील विविध पक्ष संघटनाच्या प्रमुख महिलांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश करून आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात पुणे शहरातील विविध पक्ष संघटनेच्या महिला सहभागी झाल्या होत्या .यावेळी राज्य सरकार व केंद्र सरकार कडून नवीन अतिशय कडक कायदा करण्याची मागणी निवेदनातून जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्याकडे करण्यात आली .
यावेळी अत्याचार करणाऱ्या व्यक्तींचा प्रतीकात्मक पुतळा करून त्याला जोडे मारण्यात आले.
अत्याचाराला शिक्षा झालीच पाहिजे,बंद करा बंद करा महिलांवरील अन्याय बंद करा,शक्ती कायदा तत्काळ लागू करा यासह महिलांनी विविध घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता .
या आंदोलनात रिपब्ल्लिकन पार्टी ऑफ इंडिया महिला आघाडी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संगीता आठवले ,बहुजन युवा फाउंडेशन अध्यक्षा आरती साठे ,नगरसेविका पुजा मनिष आनंद ,काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष संगीता तिवारी,भीम छावा अध्यक्ष निलम गायकवाड , रिपब्लिकन युवा मोर्चा महिला प्रदेशाध्यक्ष सुवर्णा डबाळे ,निशा सूक्रे ,विशाखा गायकवाड ,शोभना पनिकर,प्रियंका मधाले ,सरोज त्रिपाठी ,रमा भोसले ,कांता ढोरे यासह विवध पक्ष ,संघटनाच्या प्रमुख महिला उपस्थित होत्या .
