Monday, August 3, 2026
Latest NewsMAHARASHTRA

पॅरोलवर सुटलेल्या सराईत गुन्हेगाराकडून महिलेल्या तोंडात बोळा कोंबून बलात्कार

नाशिक : पॅरोलवर सुटलेल्या सराईत गुन्हेगाराने एका ब्यूटी पार्लर चालक महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना आज नाशिक येथे घडली. आज सकाळी पीडित महिला पार्लरमध्ये पूजा करत असताना या आरोपीने दुकानात शिरुन या महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. यावेळी आरोपीने पीडित महिलेला चाकूचा धाक दाखवत तोंडात बोळा कोंबून व तिचे हात बांधून तिच्यावर जबरदस्ती केल्याचा आरोप महिलेने केला आहे. याप्रकरणी अंबड पोलिसात ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिकमध्ये पवननगर भागात ही घटना घडली. पिडीत महिला ही ब्यूटी पार्लर चालक आहे. आज सकाळी ही महिला आपल्या पार्लरमध्ये पूजा करत असताना संशयित आरोपी दुकानात घुसला. त्यानंतर आतून दरवाजा लावून आरोपीने तिला चाकूचा धाक दाखवला तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप पीडितेने केला आहे.

दरम्यान, आरोपी हा खुनाच्या गुन्ह्यात जेलमधून पॅरोलवर सुटल्यानंतर फरार झाला होता. त्याचा शोध सुरु असतानाच त्याने बलात्काराचा गुन्हा केला असून फरार आरोपीचा शोध सुरु आहे. नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी घटनेची माहिती कळताच अंबड पोलीस ठाण्यात दाखल झाले  आहेत. आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांची चार पथकं रवाना झाली आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading