Wednesday, November 18, 2026
Latest NewsNATIONALTOP NEWS

पंजाब – काँग्रेस पुन्हा संकटात, नवज्योयसिंग सिद्धू यांचा प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा

अमृतसर : पंजाबमध्ये काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग विरूद्ध नवज्योतसिंग सिद्धू संघर्षाला नवे वळण लागताना दिसत आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणून नुकतीच नियुक्ती झालेल्या नवज्योतसिंग सिद्धू यानेही काँग्रेसाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.

दरम्यान, कॅप्टन अमरिंदर सिंग आज दिल्लीत असून भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर सिद्धू यांनी समर्थकांना मंत्रिमंडळात योग्य स्थान मिळाले नसल्याने राजीनामा दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Leave a Reply