केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत भारती विद्यापीठ अभियांत्रिकी विद्यार्थी यशस्वी

पुणे : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत भारती अभिमत विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अभिजीत सिंग, इक्बाल दर हे दोन माजी विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आनंद भालेराव यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. अभिजीत सिंग ला ५८६ वी रँक मिळाली आहे तर इक्बाल दरला ६११वी रँक मिळाली आहे. अभिजीत सिंग ने भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयातून इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीकम्युनिकेशन्स् विषयातून बी.टेक. पदवी घेतली आहे. इक्बाल दरने याच महाविद्यालयातून सिव्हील इंजिनियरिंगची पदवी घेतली आहे.

या यशात भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयातून मिळालेल्या शिक्षणाचा, अभ्यासाची शिस्त, गुणवत्तेचा मोठा वाटा आहे, असे या विद्यार्थ्यांनी सांगीतले.

हे दोन्ही विद्यार्थी अभ्यासात हुशार होते. सर्व उपक्रमात हिरीरीने सहभागी होत असत, त्यांच्या यशाने सर्वांना आनंद झाला आहे, असे डॉ. आनंद भालेराव यांनी सांगीतले.

Leave a Reply

%d bloggers like this: