रोटरी क्लब ऑफ फुरसुंगीचे उद्घाटन , सामाजिक कार्यांसाठी क्लबची स्थापना

पुणे : रोटरी क्लब ऑफ पुणे मगरपट्टा सिटी ने रोटरी क्लब ऑफ फुरसुंगीची स्थापना आणि प्रतिष्ठापण केले. रोटरी क्लब ऑफ फुरसुंगीची चार्टर सेरेमनी नुकतीच आयोजित करण्यात आली होती. यावेळी डिस्ट्रीक गवर्नर पंकज शाह मुख्य अतिथि आणि संजय जगताप (एमएलए) सन्माननिय अतिथी म्हणुन उपस्थित थे. जे स्वत एक रोटरियन आहेत.

रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ चे पीडीजी प्रशांत देशमुख, डिस्ट्रीक मेंबरशीप डाईरेक्टर शितल शहा, एजी संदीप विलेकर, एजी सूर्यकांत चौधरी , डॉ.आबनावे यांच्यासह इतर मान्यवर देखील यावेळी उपस्थित होते. या वेळी फुरसुंगीच्या नवीन क्लबला भविष्यात मोठे सामाजिक योगदान देण्यासाठी उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.

यावेळी रोटरी क्लब ऑफ पुणे मगरपट्टा सिटीचे अध्यक्ष रवी मिश्रा आणि डीजी पंकज शाह यांनी संजय हरपळे यांना रोटरी क्लब ऑफ फुरसुंगीचे चार्टर प्रेसिडेंट आणि आरटीए किरण हाके यांना चार्टर सेक्रेटरी म्हणून नियुक्त केले. डीजी पंकज  शाह   यांनी रोटरी वर्ष २१-२२ साठी क्लब संचालकांचे पिनिंग केले.
क्लबचे सल्लागार रोटेरियन अनिल शितोळे यांनी या क्लबच्या स्थापनेत महत्वाची भूमिका बजावली. त्यांनी याच दिवशी क्लबमध्ये ११ नवीन सदस्य जोडले आणि सदस्य संख्या ६२ वर नेली. हा नवीन रोटरी क्लब देखील सामाजिक कार्यांसाठी आणि रोटरीची ध्येय-धोरणे साध्य करण्यासाठी वचनबद्ध आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: