लोकशाहीचा आत्मा भ्रष्ट झाला – तुषार गांधी

पुणे :“ सरकारने शिक्षणाची रूपरेषा तयार करून ती विद्यार्थ्यांवर थोपवली आहे. देशातील शिक्षण संस्थांमधून विद्यार्थी नाही तर प्रोडक्ट बाहेर पडत आहे. त्यामुळेच शिक्षणाची पद्धत पंगू बनत आहे. देशातील जवळपास सर्वंच शिक्षण संस्था या गुलाम बनल्या आहेत. येथील विद्यार्थी सुटाबुटात दिसतो पण चाणक्ष बुद्धिवान दिसत नाही. त्यामुळेच असे म्हणू शकतो की देशाचा आत्माच भ्रष्ट झालेला आहे.” असे विचार तुषार गांधी यांनी व्यक्त केले.

भारतीय छात्र संसद फाऊंडेशन, एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ऑनलाइन ११ व्या भारतीय छात्र संसदेच्या सातव्या सत्रात ‘ सार्वजनिक संस्थांची पवित्रता कमी होणे तथ्य किंवा खोटेपणा’ या विषयावर प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड हे होते.

यावेळी राज्यसभेचे खासदार जी.व्ही.एल नरसिम्हाराव, मध्ये प्रदेश येथील आमदार हिना कावरे, आमदार डॉ. संदीप सौरव आणि गौरव वल्लभ हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, रवींद्रनाथ पाटील आणि प्रा. परिमल सुधाकर हे उपस्थित होते.

तुषार गांधी म्हणाले,“ सरकारने देशाच्या चार महत्वपूर्ण स्तंभावर घाव घालून त्याला अतिशय कमकूवत बनविण्याचा प्रयत्न केला आहे. या देशाचे दुर्भाग्य आहे की आम्ही आपल्या पेक्षा कमकुवत देशाबरोबर तुलना करून आम्ही मोठे आहोत हे सिद्ध करण्याचा मागे लागलो आहोत. त्यामुळे अशा मानसिकतेतून बाहेर निघावे. लोकशाही या शब्दाचा अर्थच जनतेला कळत नाही असे वाटते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी भ्रष्ट झालेल्या लोकशाहीचा आत्मा शोधण्याचा प्रयत्न करावा. भविष्यात लोकशाही शक्ती बनेल या दिशेने युवकांनी कार्य करण्यासाठी आवाज उठवावा.”

आमदार डॉ. संदीप सौरव म्हणाले,“ सरकारने देशातील बर्‍याच सामाजिक संस्था व विद्यापीठांवर हल्ले केले आहेत. केंद्रीय विद्यापीठांमध्ये प्राध्यापकांच्या भर्तीबद्दल बर्‍याच वाईट गोष्टी समोर येतांना दिसतात. युनिव्हर्सिटीमध्ये युनिवर्सच्या गोष्टी सोडून बाकी सर्व काही घडतांना दिसत आहेत. देशात निर्णय घेणार्‍यांना बाजूला डावलून भलतेच लोक निर्णय घेतांना दिसतात. देशात लोकशाही वाचली नाही तर समाजिक संस्था सुद्धा वाचणार नाही.”

 

Leave a Reply

%d bloggers like this: