अधिक मासानिमित्त मुलींसह सुनेचाही सन्मान; चांदीच्या चपलांचे अनोखे वाण
पिंपरी-चिंचवड : अधिक मासानिमित्त मुलींना वाण देण्याची परंपरा जपत पिंपरी-चिंचवड येथील सचिन बारणे यांनी आपल्या दोन मुलींसह सुनेलाही समान सन्मान देत चांदीच्या चपलांची भेट दिली आहे. मुलगी आणि सून यांच्यात कोणताही भेदभाव न करता तिघींनाही एकसारखे वाण दिल्याने या उपक्रमाची परिसरात चर्चा होत आहे.
बारणे यांनी आपल्या दोन मुली आणि सुनेसाठी खास चांदीच्या चपला तयार करून घेतल्या आहेत. या चपला अत्यंत आकर्षक असून त्यावर नक्षीकाम, खडे आणि घुंगरू बसविण्यात आले आहेत. प्रत्येक चपलीच्या जोडीचे वजन सुमारे २५० ग्रॅम असून तिन्ही जोड्यांचे एकूण वजन ७५० ग्रॅम आहे. सध्याच्या बाजारभावानुसार प्रत्येक जोडीची किंमत सुमारे एक लाख रुपयांच्या आसपास असल्याचे सांगण्यात आले.
भारतीय परंपरेनुसार अधिक मासात चांदीचे दान अथवा भेटवस्तू देणे शुभ मानले जाते. त्याच परंपरेचे पालन करत बारणे कुटुंबीयांनी हा उपक्रम राबविला. विशेष म्हणजे या चपला केवळ शोभेच्या वस्तू नसून दैनंदिन वापरासाठीही योग्य आहेत. वापरताना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी त्यांची रचना काळजीपूर्वक करण्यात आली आहे.
या चांदीच्या चपला रहाटणी येथील कोकणे चौकातील रांका ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेडमार्फत तयार करून घेण्यात आल्या. चपला बनविण्याच्या प्रक्रियेदरम्यान बारणे कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते. राजस्थानमधील कुशल कारागिरांनी अवघ्या आठ दिवसांत या चपलांची निर्मिती केली.
दरम्यान, अधिक मासानिमित्त एका ग्राहकाने आपल्या जावयाला वाण म्हणून चांदीची मोजडी भेट दिली आहे. ही मोजडीही दैनंदिन वापरासाठी योग्य असून त्यावर आकर्षक मिनाकारीचे काम करण्यात आले आहे. राजस्थानमधील कारागिरांनी तयार केलेली ही मोजडी पाहणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
अधिक मासाच्या निमित्ताने नातेसंबंधांमध्ये समानता, स्नेह आणि परंपरेचा सुंदर संगम घडवून आणणारे हे उदाहरण अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
Share this:
- Share on X (Opens in new window) X
- Share on Facebook (Opens in new window) Facebook
- Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp
- Share on Telegram (Opens in new window) Telegram
- Share on LinkedIn (Opens in new window) LinkedIn
- Share on Pinterest (Opens in new window) Pinterest
- Email a link to a friend (Opens in new window) Email
- Print (Opens in new window) Print
