गोल्डन बॉय नीरज चोप्रा ने केले ‘या’ डान्सरला प्रपोज
टोकियो ऑलम्पिक मध्ये भारतासाठी सुवर्ण पदक जिंकल्यापासून गोल्डन बॉय नीरज चोप्रा हा सर्व भारतीयांच्या गळ्यातला ताईत बनला आहे. त्याची कामगिरी, त्याची पर्सनालिटी आणि स्टायलिश केसांमुळे अनेक आघाडीच्या अभिनेत्रींपासून लाखो मुली त्याच्यावर फिदा आहेत. अलीकडे नीरज अनेक टीव्ही रिअॅ लिटी शोमध्ये हजेरी लावतानाही दिसत आहे. नुकतेच तो डीज्ने प्लस हॉटस्टार वरील ‘डान्स प्लस’ या शो मध्ये गेला होता. तिथेच गोल्डन बॉय नीरज चोप्रा ने ‘या’ डान्सरला प्रपोज केलं.
यावेळी नीरज ने ‘डान्स प्लस’या शोची परीक्षक शक्ती मोहन हिला सेटवरच प्रपोज केलं. यावेळी उपस्थितांमध्ये एकच खळबळ उडाली. याचा व्हिडिओ देखील सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. शक्ती मोहन ही उत्कृष्ठ डान्सर असून गेल्या अनेक सीजन पासून ती ‘डान्स प्लस’या शोची परीक्षक राहिली आहे. तिचा फॅशनेबल लुक आणि घायाळ नृत्य शैलीमुळे असंख्य लोक तिच्यावर फिदा आहेत.
