पंकजा मुंडेंच्या कारखान्यांसह राज्यातील ४४ साखर कारखाने काळ्या यादीत

मुंबई : शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याचा ठपका ठेवत ४४ साखर कारखान्यांना साखर आयुक्तांनी काळ्या यादीत टाकले आहे. या यादीत भाजप नेत्या पंकजा मुंडे, माजी मंत्री सुभाष देशमुख यांच्या साखर कारखान्याचा समावेश आहे.

राज्यातील कोणत्या साखर कारखान्याची परिस्थिती काय आहे, याची माहिती शेतकऱ्यांना कळावी, यासाठी प्रथमच कारखान्यांचा लेखाजोखा जाहीर करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्यानुसारसाखर आयुक्तांनी साखर कारखान्यांची काळ्या यादी जाहीर केली.

गळीत हंगामासाठी तयार असलेल्या १९० कारखान्यांची नियमित ऊसदर देणे, विलंबाने उसाची रक्कम देणे आणि वेळेत ऊसदर न दिल्याने झालेली कारवाई या निकषांआधारे चांगला-मध्यम-वाईट अशी वर्गवारी साखर आयुक्तांनी जाहीर केली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस येथील पांडुरंग सहकारी साखर कारखाना, माढा येथील विठ्ठल सहकारी साखर कारखाना, विठ्ठल कार्पोरेशन कारखाना(खासगी), बबनराव शिंदे साखर कारखाना (खासगी), विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना (खासगी) एवढेच कारखाने शेतकऱ्यांना नियमित देणी देत आहेत. तसेच १४ कारखान्यांवर देणी थकविल्याप्रकरणी कारवाई झाली. कोल्हापुरात एकाही कारखान्यावर लाल फुली नसून सांगली,सातारा जिल्ह्यात प्रत्येकी पाच, पुणे जिल्ह्यात दोन, उस्मानाबाद जिल्ह्यात पाच, अहमदनगर एक, तर नाशिक जिल्ह्यात तीन कारखान्यांवर लाल फुली मारण्यात आली आहे. मराठवाड्यातील ११ कारखान्यांनी शेतकऱ्यांची देणी थकविली किंवा फसवणूक केल्याचे समोर आले.

Leave a Reply

%d bloggers like this: