Saturday, June 13, 2026
ENTERTAINMENTLatest News

ती परत आलीये मध्ये कोणी तरी येणार येणार गं!!!

झी मराठीवर नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आलेली ती परत आलीये हि मालिका चांगलीच रंगत चालली आहे. या मालिकेने अगदी पहिल्या भागापासूनच प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे त्यामुळे या मालिकेला प्रेक्षक आणि चाहत्यांकडून भरगोस प्रतिसाद मिळतोय. या मालिकेत रोहिणीची व्यक्तिरेखा ही गरोदर दाखवण्यात आहे. रिसॉर्टवर अडकल्यापासून या सर्व मित्र मैत्रिणींच्या आयुष्यात खूप काही घडतंय. त्यात रोहिणी गरोदर असल्यामुळे तिची काळजी सगळ्यांनाच आहे. त्यामुळे तिचं डोहाळे जेवण करण्याचं सर्वजण ठरवतात.

डोहाळे जेवण हा कार्यक्रम लोकप्रिय मराठी चित्रपट ‘अशी ही बनवाबनवी’ मधील कोणी तरी येणार येणार गं या गाण्याशिवाय अपूर्ण आहे. त्यामुळे मालिकेत देखील वातावरणातील गंभीरता कमी करण्यासाठी अगदी उत्साहात रोहिणीचं डोहाळे जेवण साजरी करण्यात येणार आहे आणि त्यात हे गाणं देखील असणार आहे. या गाण्यावर हणम्या म्हणजे अभिनेता समीर खांडेकर आणि टिक्या म्हणजेच अभिनेता प्रथमेश हे दोघे थिरकताना दिसतील. या गाण्याच्या शूटिंगच्या दरम्यान सर्व कलाकारांनी धमाल केली आणि या गाण्याच्या शूटींगचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. नेटिझन्सना देखील सर्व कलाकारांची शूटिंग दरम्यान चालली मजा मस्ती पाहून धमाल येतेय. ती परत आलीये मालिकेत आलेले हे आनंदाचे क्षण किती वेळ टिकतील? या आनंदावर विरजण पाडण्यासाठी ‘ती’ काही अघटित घडवून आणणार का? हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळेल.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading