Saturday, June 13, 2026
Latest NewsPUNE

भाजप वकिल आघाडी जिल्हाध्यक्ष ॲड. संजय सावंत यांच्या उपस्थितीत खेड तालुका पदाधिकाऱ्यांची निवड

राजगुरुनगर :खेड येथे कायदा आघाडीच्या प्रदेश सह संयोजक पदी ॲड. प्रदीप उमाप, तालुका संयोजक पदी ॲड. विजय रेटवडे आणि खेड बार असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष ॲड. देवीदास शिंदे यांच्या सत्काराचा कार्यक्रम भाजपा खेड तालुका व जिल्हा वकील आघाडीच्या वतीने आयोजित केला गेला. यावेळी वकील आघाडी तालुका अध्यक्ष ॲड. रेटवडे तसेच बाकीचेही निवडीचे पत्र भाजपा संघटन सरचिटणीस ॲड. धर्मेंद्र खांडरे, भाजपा जिल्हाअध्यक्ष वकील आघाडी ॲड. संजय सावंत पाटील, जि.प. सदस्य अतुल भाऊ देशमुख, भाजपा तालुका अध्यक्ष शांताराम भोसले यांच्या नेतृत्वात देण्यात आले.
सर्वसाधारण सभा खेड भारतीय जनता पार्टी कार्यालय चांडोली फाटा खेड या ठिकाणी घेण्यात आली यावेळी सभेला भाजपा संघटन सरचिटणीस ॲड. धर्मेंद्र खांडरे, भाजपा जिल्हाअध्यक्ष वकील आघाडी ॲड. संजय सावंत पाटील, जि.प. सदस्य अतुल भाऊ देशमुख, भाजपा तालुका अध्यक्ष शांताराम भोसले यांनी संबोधले,

 जिल्हाध्यक्ष ॲड. संजय सावंत पाटील मोठ्या सर्व जिल्हा व तालुका वकील संघटनेला भाजपा कडून योग्य ते संरक्षण देण्यात येईल तसेच संघटनेतील प्रत्येक वकिलांना योग्य ते मार्गदर्शन करण्यात येईल, भारतीय जनता पार्टी च्या प्रत्येक कार्यकर्त्याला तसेच होऊ घातलेल्या निवडणुकीत कायद्याची माहिती देण्यात येईल तसेच न्यायालईन प्रक्रियेत मदत करण्यात येईल, तसेच विरोधकांनी जे खोटे नाटे भाजपा कार्यकर्ता वरती गुन्हे दाखल केले आहेत त्यामध्ये सुद्धा भाजपा पुणे वकील आघाडी तसेच तालुका वकील आघाडी तर्फे सर्व भाजपा कार्यकर्त्याला मागदर्शन आणि न्यायालयीन बाबतीत मदत करण्यात येईल अशा विश्वास दिला.यावेळी अधिवक्ता आणि समाज या विषयावर सविस्तर विषयाची मांडणी केली.


भाजपचे माजी मंत्री बाळा भेगडे, जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे यांच्या मागादर्शनाखाली सादर कार्यक्रम पार पाडला. यावेळी कार्य मध्ये उपस्थित मान्यवर खेड तालुका सरचिटणीस ॲड.  प्रीतम आण्णा शिंदे,  गुलाबनाना खांडेभरड,  ॲड. मालनीताई शिंदे, वकील आघाडी जिल्हा सह सचिव ॲड. शिवशंकर आघाव, अजय जगनाडे, ॲड. शीतल बडदे , मनोज मांजरे, वींद्र दोरगे, अण्णा कुमठेकर,  ॲड.संदीप मलघे,ॲड. श्रद्धा भालेराव,ॲड.दीपक चौधरी, ॲड. संदीप घुले,  गणेश गाडे, रामदास रेटवडे,   संजय बन्सेवाड. संजय म्हस्के आर पी आय युवक युवक तालुका अध्यक्ष आकाश डोळस, सुभाष हिंगे आदी  उपस्थीत होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading