Wednesday, November 18, 2026
ENTERTAINMENTLatest News

आमिर खानच्या ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटाची रिलीज डेट जाहीर

मिस्टर परफेक्टनिस्ट आमिर खानचा ‘लाल सिंह चड्ढा’ हा चित्रपट आता पुढील वर्षी व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी प्रदर्शीत होणार आहे. आज आमिर खान प्रोडक्शनने ट्विट करून ही माहिती दिली आहे. या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, सिनेमागृहे 22 ऑक्टोबरला अनलॉक होणार आहेत. पण कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आम्ही ‘लाल सिंह चड्ढा’ हा सिनेमा पुढल्या वर्षी व्हॅलेंटाईन डे ला प्रदर्शीत करण्याचा निर्णय घेतला आहे.

‘लाल सिंह चड्ढा’ हा चित्रपट हॉलिवूडच्या ‘फॉरेस्ट गंप’ चित्रपटाचा हा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटातून साउथचा स्टार नागा चैतन्य बॉलिवूडमध्ये एंट्री करणार आहे. याशिवात या चित्रपटात आमिर खान सोबत करीना कपूर, मोना सिंह दिसणार आहेत.

Leave a Reply