पुणे शहरामध्ये गेल्या 24 तासात कोरोनाचे 134 नवीन रुग्ण
पुणे: शहरामध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मागील काही दिवसांपासून नवीन रुग्णांच्या तुलने बरे होण्याऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त होते. परंतु आज रुग्णांची कमी असून दीडशे च्या खाली आज रुग्ण सापडले आहेत. पुणे शहरामध्ये गेल्या 24 तासात 134नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 211रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पुणे शहरात आजपर्यंत 5लाख 00हजार 385इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 4लाख 89हजार 892इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 12रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 7तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 5रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 9020जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.शहरामध्ये सध्या 1473रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. त्यापैकी 182रुग्ण गंभीर आहेत
आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रांवर 8694 स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
