Saturday, September 26, 2026
ENTERTAINMENTLatest News

बहुप्रतीक्षित ’83’ चित्रपट ‘या’ दिवशी होणार रिलीज

महाराष्ट्रातील सर्व चित्रपटगृहे 22 ऑक्टोबरपासून पुन्हा सुरू होत आहेत. या पार्श्वभूमीवर आगामी काळात कोणते चित्रपट प्रदर्शित होणार याकडे सिनेरसिकांचे लक्ष आहे. आज अभिनेता रणवीर सिंग याने ’83’ चित्रपट लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असल्याचे जाहीर केले आहे. हा चित्रपट यावर्षी ख्रिसमसच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे.

रणवीरने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेयर करीत ही माहिती दिली. त्यांनी लिहिले, “प्रतिक्षा संपली आहे. चित्रपट 83 ख्रिसमसच्या निमित्ताने यावर्षी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट हिंदी, तामिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये प्रदर्शित होईल.” भारतीय क्रिकेट टीमने 1983 साली वेस्ट इंडिजला हरवून भारताला पहिला विश्वचषक मिळवून दिला. यावर हा चित्रपट आधारीत आहे. या चित्रपटात रणवीर सिंग माजी क्रिकेटपटू कपिल देवच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात दीपिका पदुकोण, पंकज त्रिपाठी, बोमन इराणी, साकिब सलीम, हार्डी संधू, ताहिर राज भसीन, जतीन सरना यांच्याही भूमिका आहेत.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading