शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ भारत बंद’ला संभाजी ब्रिगेड’चा जाहीर पाठिंबा-चंद्रशेखर घाडगे
पुणे:केंद्र सरकार शेतकरी विरोधी आहे. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय न घेतल्यामुळे व शेतकरीविरोधी काळे कायदे देशात लागू केल्यामुळे केंद्र सरकारवर शेतकरी वर्ग प्रचंड नाराज आहे. मोदी सरकार भांडवलदारांचे (अदानी, अंबानीचे) सरकार असल्यामुळे भांडवलदारांच्या हिताचे निर्णय केंद्र सरकार घेत आहे. केंद्रीय कृषिमंत्र्यांना शेतकऱ्यांची दुःख दिसत नाहीत. दिल्लीत वर्षभर चालणाऱ्या आंदोलनाची दखल घेत घेत नाही याचा अर्थ केंद्र सरकारची ही रानटी प्रवृत्ती आहे. या विरोधात उद्या देशव्यापी बंदला संभाजी ब्रिगेडचा जाहीर पाठिंबा आहे.
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे आणि महासचिव सौरभ खेडेकर यांच्या सुचनेनुसार पुणे जिल्ह्यात प्रत्येक ठिकाणी संभाजी ब्रिगेड बंद मध्ये सहभागी होणार आहे. असे संभाजी ब्रिगेड चे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे यांनी सांगितले, शेतकऱ्यांच्या हितासाठी संभाजी ब्रिगेड आजपर्यंत नेहमी संघर्ष करत आलेली आहे. म्हणून शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ… संभाजी ब्रिगेड मैदानात आहे.
केंद्र सरकारने शेतकऱ्यां विरोधात मंजूर केलेले कृषी कायदे आणि कामगार कायदे हे शेतकरी विरोधी असून शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याची सुपारी केंद्र सरकारने घेतलेली आहे. यामुळे शेतकरी आणि कामगार उध्वस्त होणार असून सरकारने याकडे वेळीच गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. शेतकऱ्याच्या संघर्षाचा वणवा पेटत आहे. केंद्र सरकारने गांभीर्याने लक्ष देऊन उध्वस्त होणाऱ्या शेतकरी, शेतमजूर, कामगार यांना बळ देण्याचं काम करावं आणि काळे कायदे तात्काळ पाठीमागे घ्यावेत. उद्याच्या भारत बंदला संभाजी ब्रिगेडचा जाहीर पाठिंबा आहे. पुणे जिल्ह्यात उद्या भारत बंद च्या दरम्यान संभाजी ब्रिगेड पुणे जिल्ह्याच्या वतीने केंद्र सरकारचा जाहीर निषेध करण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे यांनी दिली,
