Thursday, June 18, 2026
Latest NewsPUNE

 २७ सप्टेंबर रोजी राज्यात कडकडीत भारत बंदचे काॅंग्रेस पक्षाचे आवाहन 

पुणे : देशातल्या सर्व वैधानिक संस्था ताब्यात घेऊन सार्वजनिक संस्था विकून शेतकरी व सर्व सामान्यांना देशोधडीला लावण्याचे पाप भाजप सरकार करीत आहे.या जुलमी व अत्याचारी भाजपा सरकार विरोधात देशातील सर्व शेतकरी संघटना, डाव्या आघाड्यांनीआवाज उठविला असून, सोमवार दिनांक २७ सप्टेंबर २०२१रोजी भारत बंदचे आवाहन केले आहे अखिल भारतीय काॅंग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी दिलेल्या आदेशानुसार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी व पुणे जिल्हा काँग्रेस कमिटी (ग्रामीण) ताकदीने या आंदोलनात सहभागी होत आहे.यात जिल्हा पदाधिकारी,ब्लाॅक अध्यक्ष,प्रिंटर सेलसमवेत सर्व सहभागी होणार आहेत. अशी माहिती सरचिटणीस व प्रवक्ता पृथ्वीराज अ. पाटील यांनी दिली.
देशातील जनतेला भरमसाठ खोटी आश्वासने देऊन आलेल्या भाजपच्या हुकूमशाही राजवटीने आणलेल्या शेतकरी विरोधी तीन काळ्या कायद्यामुळे संपूर्ण देशाची आर्थिक स्थिती पूर्ण:तर ढासळली आहे.हे कायदे मागे घ्यावेत म्हणून जगाचा पोशिंदा गेल्या ११ महिन्यापासून दिल्लीत ठाण मांडून बसलेल्या आहे तरी या जुलमी सरकारला त्यांची कीव येत नाही उलट त्यांचा क्रूरपणे छळ केला जात आहे.हि बाब केंद्रातल्या भाजप सरकारसाठी निर्लजास्पदा आहे.देशातील सार्वजनिक उपक्रम जसे रेल्वे. बॅंका विमानसेवा,रस्ते,विमा कंपन्या सार्वजनिक उद्योग.दूरसंचार, आणि बंदरे इत्यादी एक एक करून विकत आहेत . अलिकडेच विक्री झालेल्या बंदरातून २१हजार कोटी किंमतीच्या ड्रगतस्करी सापडली आहे, तरुणांना दरवर्षी २कोटि रोजगार देऊ असं आश्वासन देणाऱ्या भाजपासरकारने असलेल्या नोकऱ्या संपुष्टात आणल्या आहेत . यासाठी खालील मुद्दे आंदोलनात मांडण्यात येणार आहेत.
१) शेतकऱ्यांचा विरोधात तीनही जुलमी काळ्या कायद्याला विरोध करावा २) दिल्लीमध्ये मागील ११महीन्यापासून आंदोलन करीत असलेल्या शेतकऱ्यांना पाठिंबा व्यक्त करावा३) कामगारांना बरबाद करणाऱ्या कायद्याला विरोध करावा ४) देशातील तरुणांना बेरोजगार करणाऱ्या मोदी सरकारचा तीव्र निषेध करावा ५) पेट्रोल, डिझेल,व घरगुती गॅस, जीवनावश्यक वस्तूंची कृत्रिम महागाई वाढवणाऱ्या भाजपा केंद्र सरकारचा निषेध करावा.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading