पुरूष पोलिस कर्मचाऱ्यांचीही ड्यूटी ८ तास करावी पोलिस मित्र संघटनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
राज्यातील महिला पोलिसांची कर्मचारी यांच ड्यूटी ८ तास केल्याबद्दल राज्य सरकारचे अभिनंदन
पुणे : राज्यातील महिला पोलिस कर्मचारी यांची ड्यूटी ८तास केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र संघटनेचे अध्यक्ष श्री. राजेंद्र कपोते राज्यसरकारचे अभिनंदन केले आहे व अशाच पध्दतीने पुरुष पोलिस कर्मचारी यांचीही ड्यूटी ८तास करावी अशी मागणी केली आहे.संघटना याबाबत अनेक वर्षांपासून पाठपुरावा राज्य सरकारकडे करीत आहे त्यांनी नुकतेच निवेदन या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि या उपमुख्यमंत्री अजित पवार व या गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना दिले आहे.
सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना ८तास ड्यूटी असताना पोलिसांना मात्र १२ते१६ तास ड्यूटी करावी लागू गणपती उत्सव, सणसूद, व्हि.आय. पी. पोलिस बंदोबस्त, मोर्चे यामध्ये जास्त तास ड्युटी करावी लागते कोरोनासारख्या आपत्कालीन परिस्थितीत तर २४ तास ड्युटी करावी लागते रजा तसेच सुट्या रद्द केल्या जातात , सर्व वेळ बंदोबस्त व कर्तव्यात जात असल्यामुळे स्व:यांच्या कुटुंबाकडे मुलाबाळांकडे, स्व:ताच्यि आरोग्याकडे वेळेअभावी दुर्लक्ष होते. अनेक आजार जडतात, वाहतूक पोलिसांची तीच समस्या आहे, प्रदूषणामुळे श्वसनाचे, फुफ्फुसाचे विकार जडतात , पोलिसांना पुरेशी विश्रांती मिळत नसल्यामुळे अनेक आरोग्य समस्या निर्माण होतात, कुटुंबासमवेत वेळ घालवता येत नसल्यामुळे चिडचिड, मानसिक समस्या निर्माण होतात, यातून आत्महत्या सारखे प्रकार घडतात.या सर्व बाबींचा सहानूभूतीपूर्वक विचार करून महिला पोलिसां प्रमाणे राज्यातील पुरुष पोलिसांची ड्यूटी ८ तास करावी यामुळे पोलिसांच्या अनेक समस्या मिटतील व तो अधिक क्षमतेने व चांगल्या प्रकारे जनतेची सेवा करेल, असे पोलिस मित्र संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कपोते यांनी सांगितले
