Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

Pune – गेल्या 24 तासात नवीन कोरोनाचे 171 रुग्ण तर 196 रुग्णांना डिस्चार्ज

पुणे: शहरामध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मागील काही दिवसांपासून नवीन रुग्णांच्या तुलने बरे होण्याऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त होते. परंतु आज रुग्णांची कमी  असून दोनशे च्या खाली आज रुग्ण सापडले  आहेत. पुणे शहरामध्ये  गेल्या 24 तासात 171नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 196रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुणे शहरात आजपर्यंत 5 लाख 00 हजार  251 इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 89 हजार 945 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 7 तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 3रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 9018जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.शहरामध्ये सध्या 1552रुग्ण अ‍ॅक्टिव्ह  आहेत. त्यापैकी 185रुग्ण गंभीर आहेत आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रांवर 8285 स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading