सेलिब्रिटींनी समाजकल्याणासाठी कार्य करावे – अभिनेत्री शबाना आझमी
नंदिता दास म्हणाल्या,“ सोशल मिडियाने समाजात बरेच बदल आणले आहे. स्टार कोण आहे हे कसे ठरविणार आहे. सध्याच्या काळात स्टारडमचे स्तर वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळी आहेत. वर्तमान काळात प्रत्येक क्षेत्रात सेलिब्रिटी आहेत. खरे तर शिक्षक हे सर्वात मोठे सेलिब्रिटी आहेत. त्यामुळे त्यांची आर्थिक सुधारणेवर अधिक भर देण्याची गरज आहे. देशात खरे सेलिब्रिटी खूप मोठे आहेत त्यांना शोधून त्यांचा उपयोग समाजसेवेसाठी करावा.”
डॉ. सोनल मानसिंग म्हणाल्या,“ तपस्या, साधना, श्रध्दा, ज्ञान योग आणि भक्ति योग यांना योग बनविल्यास जीवनात यश मिळते. त्यानंतर आपण स्वतः सेलिब्रिटी बनता. जीवनात कठीण परिश्रम, शिस्त, लक्ष्य आणि सर्वांचा आदर केल्यास व्यक्ती मोठा बनतो. समर्पण भावनेने आणि मन मोकळे करून जीवन जगा.
