Sunday, September 27, 2026
Business

धूतपापेश्र्वर चे शिरोभ्यंगासाठी कांचन केश तेल बाजारात दाखल

पुणे : श्री धूतपापेश्र्वर लिमिटेड या आयुर्वेद औषध कंपनी ने शिरोभ्यंगासाठी कांचन केश तेल बाजारात आणले आहे. कांचन केश तेलाची निर्मिती तीळ तेल, सोबत भृंगराज, आवळा, निर्गुंडी, दूर्वा, निली, ब्राह्मी, उशीर आणि मुस्ता इ. वनस्पती द्रव्यांपासून होते. कांचन केश तेलाद्वारे केले जाणारे शिरोभ्यंग केसांना पोषण देते आणि स्काल्प (शिरोभूमी) ची काळजी घेण्यासाठी हा एक विश्‍वसनीय उपाय आहे, यापासून मिळणारे लाभ दीर्घकाळपर्यंत टिकून राहतात.

कांचन केश तेलाचा नियमित उपयोग केल्याने केसांचे आरोग्य राखले जाते. केस आणि स्काल्पचे पोषण होण्यास मदत होते, ज्यामुळे केस चमकदार, सजीव दिसतात, तसेच त्यांचा नैसर्गिक रंग सुद्धा कायम राहतो. कंपनी प्रवक्ता द्वारे मिळालेल्या माहिती अनुसार कंपनीची उत्पादने आणि त्यांची गुणवत्ता, ही आजपर्यंत जपण्यात आली असून त्यांच्या प्रति कोणत्याही प्रकारे तडजोड न केल्याने ग्राहकांनी आमच्या ब्रँडला १४८ वर्षांपासून मान्यता आणि स्वीकृती दिली आहे. कांचन केश तेल प्रस्तुत करण्याचे महत्त्वपूर्ण कारण आहे, केस आणि स्काल्पसंबंधित समस्यांचे वाढते प्रमाण, ज्याचा सामना आजच्या पिढीचे लोक करीत आहेत. यासाठी मूळ तत्त्वांच्या आधारावर आम्ही लोकांना एक असा उपाय देऊ इच्छितो, जो केमिकल्सपासून मुक्त आहे आणि केवळ नैसर्गिक घटकच समाविष्ट करतो.

आज वातावरणामध्ये वाढणारे प्रदूषण, खाण्यापिण्याच्या चुकीच्या पद्धती, मानसिक तणाव इ. अनेक कारणांमुळे केसांच्या समस्या वाढत आहेत. केस आणि स्काल्पला योग्य पोषण न मिळाल्याने केस गळणे, कोरडे होणे, केसांचा अठाभाग विभजित होणे, केस निर्जीव दिसणे इ. लक्षणे दिसतात. यावर उपाय म्हणून कांचन केश तेल काम करेल.  हे तेल सर्व आयुर्वेद दुकानांमध्ये तसेच निवडक केमिस्ट दुकानांसह आमच्या कंपनीच्या कन्झ्युमर आयुर्वेद या पोर्टल आणि अमेझॉन स्टोअर वर सुद्धा उपलब्ध आहे, अशी माहिती कंपनीच्या वतीने देण्यात आली आहे. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading