Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

आरोग्य विभागाच्या परीक्षेतील गैरव्यवहार व दिरंगाई मूळे ‘अभाविप’ चे राज्य सरकार विरोधात तीव्र निदर्शने

पुणे: अखिल भारतीय विद्यार्थी परिषेदेच्या कार्यकर्त्यांनी आरोग्य विभागाच्या परीक्षेतील गैरव्यवहार व दिरंगाई मूळे राज्य सरकार विरोधात आज  पुणे येथे तीव्र स्वरूपाचे निदर्शने केले.

आरोग्य विभागातील भरतीसाठी  परीक्षांचे आयोजन करण्यात आले होते, परंतु परीक्षा केंद्रावर अनेक गैरव्यवहार झाल्यामुळे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. परीक्षा रद्द केलेली असताना देखील काही आरोग्य सेवकांना नियुक्ती देण्यात आली. यामुळे या परीक्षेच्या पारदर्शकतेवरच प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे. पुन्हा परीक्षेचे नवीन वेळापत्रक आरोग्य विभागाने जाहीर केले, त्यानुसार दिनांक ८ सप्टेंबर  रोजी परीक्षा होणार होती.परंतु आरोग्य विभागाच्या वतीने पुन्हा नवीन वेळापत्रक घोषित करून दिनांक २५ व २६ सप्टेंबर रोजी परीक्षा होणार असल्याचे सांगितले.

. दिनांक २६ सप्टेंबर २०२१ ला आरोग्य विभाग पद ‘ड’ करता होणारी परीक्षा सकाळी १० ते १२ या वेळात ‘नाशिक’ मध्ये होत असेल तर त्याचवेळी विद्यार्थ्याची परीक्षा दुपारी ०२ ते ०४ वेळात जालना या ठिकाणी होणार असल्याचे केंद्र देण्यात आले. परीक्षार्थी विद्यार्थी नाशिक ते जालना दोन तासाच्या आत कसा जाईल ? याची हा प्रश्न विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाले व यामुळे देखील गोंधळ झाला.
अनेक विद्यार्थ्यांना हॉल तिकीट मिळाले नाहीत तसेच अनेक विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र ‘उत्तर प्रदेश’ व काही विद्यार्थ्यांना तर परीक्षा केंद्र कोड हा ‘चीन’ असल्याचे हॉल तिकीट मिळाले. यामुळे आरोग्य विभागातील परीक्षेतील सावळागोंधळ समोर येतो. कुठल्याही प्रकारची पारदर्शकता या परीक्षेमध्ये दिसून येत नाही अनेक ठिकाणी या परीक्षेमध्ये आर्थिक सट्टेबाजी होत असल्याचे आरोप देखील करण्यात आलेले आहेत.

या संपूर्ण प्रकारातुन असे लक्षात येते की महाराष्ट्र राज्य शासन विद्यार्थ्यांच्या भविष्याबाबत अत्यंत बेफिकीर आहे, राज्य सरकारने तात्काळ परीक्षा घ्याव्यात अन्यथा ‘अभाविप’ पुणे शहराच्या चौका चौकात राज्य सरकार विरोधात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल, तसेच निष्क्रिय आरोग्य मंत्री यांचा राजीनामा मिळावा अशी मागणी या वेळी भाग संयोजक क्षुदांत पाटील यांनी केली आहे.

या वेळी अभाविप पुणे महानगर मंत्री शुभम भुतकर, दयानंद शिंदे, शुभनकर बाचल, सोहम नारकर, तन्मय ओझा आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading