आरोग्य विभागाच्या परीक्षा अचानक रद्द केल्यामुळे सरकारच्या निषेधार्थ भाजयूमोचे आंदोलन
पुणे: सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आज आणि उद्या होणाऱ्या परीक्षा राज्य सरकारने काल रात्री अचानक होणार नाहीत असे जाहिर केले. त्यामुळे आरोग्य विभागाच्या परीक्षेचे विद्यार्थी जे अभ्यास करत होते त्यांच्यामध्ये नाराजी पसरली.
व विद्यार्थ्यांच्या मनात परीक्षा कधी होणार आपले पुढे काय होयचे असे विद्यार्थ्यांना प्रश्न पडू लागले. त्यामुळे आज भाजप युवा मोर्चा पुणे शहर तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
आंदोलनाच्या वेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे,व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा जाहीर निषेध करण्यात आला. या आंदोलनाचे नेतृत्व भाजप पुणे शहर युवा मोर्चा अध्यक्ष राघवेंद्र बापू मानकर यांनी केले. या आंदोलनाला भाजप युवा मोर्चा पुणे शहर उपाध्यक्ष आशिष सुर्वे, राजू परदेशी, दीपक पवार, स्वयंम बारटके, प्रतीक देसारे, व आरोग्य विभागाचे अभ्यास करणारे विद्यार्थी उपस्थित होते.
राघवेंद्र बापू मानकर म्हणाले,या ठाकरे सरकारला लाज वाटायला पाहिजे.कोरोनामुळे आधीच लोकांचे व्यवसाय, रोजगार बुडाले आहेत.त्यात आरोग्य विभागाच्या ज्या परीक्षा आज होणार होत्या त्या राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी काल रात्री आरोग्य विभागाच्या परीक्षा उद्या होणार नाहीत असे जाहीर केले. आरोग्य विभागाच्या परीक्षेचे अभ्यास करणारे विद्यार्थी हे हे सातारा, सांगली, कोल्हापूर, विदर्भ व अन्य ठिकाणाहून पुण्यात परीक्षेचा अभ्यास करायला आले आहेत. विद्यार्थ्यांशी गावाकडे काही काम धंदा नसल्यामुळे विद्यार्थी रोजगारासाठी परीक्षा देत असतात. आज आम्ही आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचा आम्ही आज जाहीर निषेध करत आहोत. जर राजेश टोपे यांनी आरोग्य विभागाची परीक्षा जर लवकर घेतली नाही तर आम्ही येथील पुढील काळात राज्यभर भाजप युवा मोर्चा आंदोलन करेल.
