Wednesday, June 17, 2026
Latest NewsPUNE

दुधात भेसळ केल्या प्रकरणी व्यापाऱ्या विरोधात गुन्हा दाखल

पुणे : दुधामध्ये भेसळ केल्या प्रकरणी अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने दूध व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी जप्त करण्यात आलेल्या दुधामध्ये व्हे पावडर व लिक्विड पॅराफीन मिसळून भेसळ करण्यात येत असल्याचे दिसून आले आहे. या प्रकरणी सुलिंद्र क्षीरसागर, अन्नसुरक्षा अधिकारी पुणे यानी वालचंदनगर पोलिस स्टेशनमध्ये राजाराम मधुकर खाडे (घर गट नं. 291 खाडे वस्ती, पो. लाकडी, ता. इंद्रापुर, जि. पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.  

अन्न व औषध प्रशासन पुणे विभागाचे सह आयुक्त शिवाजी देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, 29 जुलैला  राजाराम खाडे याचे घरावर दक्षता विभागाच्या गोपनीय माहितीच्या आधारे धाड टाकली. यावेळी गाय दुधामध्ये व्हे पावडर व लिक्विड पॅराफीन  मिसळुन दुधाची भेसळ होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या धाडीत 2714 रूपये किमतीचे 118 लिटर भेसळयुक्त गाईचे दुध जप्त करून नष्ट केले. तसेच व्हे पावडर (गोवर्धन) व लिक्वीड पॅराफीन हे अपमिश्रके 276 किलो रूपये 31 हजार 988 किंमतीचा माल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास पो. उपनिरिक्षक नितीन लाकडे करीत आहेत. 

सदरची कारबाई प्रशासनाचे पुणे विभागाचे सह आयुक्त शिवाजी देसाई यांचे मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त (अन्न) अर्जुन भुजबळ व सहायक आयुक्त (अन्न) संजय नारागुडे यांच्या उपस्थितीत अन्न सुरक्षा अधिकारी बालाजी शिंदे, अशोक इलागेर (दक्षता), राहुल खंडागळे व क्रांती बारवकर यांच्या पथकाने केली होती.

 अन्न पदार्थ /औषधाच्या भेसळी बाबत येथे तक्रार नोंदवा 

दुधात भेसळ करणा-या विरुध्द या पुढेही प्रशासनतर्फे कडक कारवायांचे सत्र असेच सुरु ठेवण्यात येणार आहे. भेसळीबाबत अथवा अन्न पदार्थ /औषधाच्या दर्जाबाबत काही तक्रार असल्यास प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक 1800222365 किंवा कार्यालयातील दुरध्वनी क्रमांक 02025882882 अथवा कार्यालयीन ई मेल fdapune2019@gmail.com यावर तक्रार नोदविण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासन पुणे विभागाचे सह आयुक्त शिवाजी देसाई यांनी केले आहे.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading