Delhi gang war : कोर्टा बाहेरच फिल्मी स्टाईल ‘गॅंगवॉर’चे थरारनाट्य
नवी दिल्ली : देशभरात दिवसागणीक गुन्हेगारीच्या घटनेत वाढ होत असताना आज राजधानी दिल्लीत कोर्टा बाहेरच फिल्मी स्टाईल ‘गॅंगवॉर’चे थरारनाट्य घडले. भरदुपारी वकिलाच्या वेशात आलेल्या आरोपींनी हे गॅंगवॉर केले. दिल्लीतील रोहिणी कोर्टाच्या आवारात हा प्रकार घडला. यामध्ये आतापर्यंत चौघांचा मृत्यू झाला असून त्यात एका गँगस्टरचाही समावेश आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, स्पेशल सेलच्या टीमने आज मोस्ट वॉन्टेड गुंड जितेंद्र मान उर्फ गोगीला कोर्ट रूममध्ये नेले होते. यावेळी वकिलाच्या वेशात आलेल्या आरोपींनी गोगीची गोळ्या घालून हत्या केली. त्यामुळे रोहिणी कोर्टाच्या आवारात एकच घळबळ उडाली. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणा बाहेर जाऊ नये म्हणून उत्तरादाखल केलेल्या गोळीबारात हल्लेखोरासह चौघाणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये गँगस्टर जितेंद्र आहे, तर जितेंद्रवर हल्ला करण्यासाठी आलेल्या तीन हल्लेखोरांचाही समावेश आहे.
कोण होता गुंड जितेंद्र मान उर्फ गोगी?
जितेंद्र गोगी हा दिल्लीतील मोस्ट वॉन्टेड गॅंगस्टर होता. दिल्लीचे स्थानिक नेते वीरेंद्र मान यांच्या हत्याकांडात जितेंद्र गोगीचा सहभाग होता. तसेच हरियाणातील प्रसिद्ध गायिका हर्षिता दाहियाच्या हत्येचा देखील आरोप त्यांच्यावर होता. दिल्ली व हरियाणा पोलिस त्याच्या मागावर होते.
