पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त परभणी लोकसभा मतदारसंघात सेवा समर्पण अभियान
परभणी : पंतप्रधान भाई नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सेवा समर्पण अभियानाच्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांनी देशभरातील गोरगरीब जनसामान्य जनतेसाठी राबवलेल्या विविध आर्थिक उन्नती च्या योजना घराघरापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांची असल्याचे युवा मोर्चाचे प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांनी सांगितले
परभणी येथे आयोजित भाजयुमोच्या बैठकी प्रसंगी लोणीकर बोलत होते यावेळी डॉ सुभाषराव कदम ,दत्ताभाऊ चेवले राजेशजी देशमुख ,भाजपा युवा मोर्चा ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे,सुभाषराव आंबट, शिवाजीराव शेळके,अभिजीत रोडगे यांची उपस्थिती होती
राहुल लोणीकर म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक पातळीवर आपल्या राष्ट्राचा गौरव वाढविला असून, गेल्या सत्तर वर्षांमध्ये गरिबी हटाव शिवाय कुठला नारा काँग्रेसने दिला नाही परंतु मोदी यांनी खऱ्या अर्थाने महिला सबलीकरण महिलांची आर्थिक उन्नती त्याच सोबत शेतकरी सन्मान योजना स्टार्ट अप इंडिया अंत्योदय यासह अनेक योजनांच्या माध्यमातून दारिद्र्याचा निर्मूलनासाठी प्रयत्न केले
पुढे बोलताना ते म्हणाले की, सेवा समर्पण सप्ताह अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावरील त्यांचा जीवनपट उलगडून दाखवणारी चित्र प्रदर्शनी, रक्तदान शिबिर, अंत्योदय, आजादी का अमृत महोत्सव, स्वच्छता के सन्मान में, नमो प्रश्नमंजुषा आधी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून परभणी जिल्ह्यामध्ये हे सर्व कार्यक्रम मोठ्या ताकतीने युवा मोर्चा करणार असल्याचे यावेळी राहुल लोणीकर यांनी परभणी जिल्हा ग्रामीण चे जिल्हा संयोजक शिवाजीराव शेळके चित्र प्रदर्शनी अनिलजी बडगुजर, अंत्योदय चे जिल्हा संयोजक विजय साखरे रक्तदान शिबिराचे जिल्हा संयोजक शिवहरी शेवाळे आजादी का अमृत महोत्सव चे जिल्हा संयोजक विजय कराड, डॉ. दैवत लाटे स्वच्छता के सन्मान में जिल्हा संयोजक अजुर्ण लटपटे ,दिलीप काळदाते, प्रभाकर वाघ आदींचा यावेळी युवा मोर्चाचे प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला
या बैठकीस भाजपा जिल्हाध्यक्ष डाॅ सुभाषराव कदम,भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे,प्रदेश सचिव अरुणजी पाठक, यांनी मार्गदर्शन केले,सूत्रसंचालन शिवाजीराव शेंळके.आभार विलास जोधळे यांनी मानले.
