Tuesday, June 16, 2026
Latest NewsLIFESTYLE

सौंदर्यकन्या मी महाराष्ट्राची आणि सौभाग्यवती मी महाराष्ट्राची स्पर्धेचे आयोजन 

तरुणाईला भुरळ घालणारा आणि सौंदर्यवतीचं सौंदर्य खुलवाऱ्या “सौंदर्यकन्या मी महाराष्ट्राची आणि सौभाग्यवती मी महाराष्ट्राची” स्पर्धेचे आयोजन दिपावलीमध्ये मोठ्या दिमाखात पार पडणार आहे. अशी माहिती द रॉयल  ग्रुप संस्थापक अध्यक्ष नितीन झगरे यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत नुकतीच दिली. महाराष्ट्रात अनेक फॅशन शो यशस्वीपणे पूर्णत्वास नेहणारे म्हणून त्यांची ख्याती आहे.
 
“सौंदर्यकन्या मी महाराष्ट्राची आणि सौभाग्यवती मी महाराष्ट्राची” या आगामी स्पर्धेच्या पोस्टरचे अनावरण मनसे नगरसेविका ऍड. रुपाली पाटील ठोंबरे व दिग्दर्शक रामकुमार शेडगे यांच्या हस्ते नुकतेच पुण्यात आयोजित केलेल्या कार्यक्रमात पार पडले. या प्रसंगी आयोजक नितीन झगरे, देवमाणूस फेम मायरा मिमी खडसे, डिझाईनर सुमैय्या पठाण, नमिता पाटील,ब्रँड अम्बेसिडर रेणुका ठाणगे आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.
 
या प्रसंगी बोलताना ऍड रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या की “द रॉयल  ग्रुपच्या वतीने महाराष्ट्रातील महिला अन युवतींना एक हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची काम यशस्वी आयोजक नितीन झगरे करत आहेत. सौंदर्यकन्या मी महाराष्ट्राची आणि सौभाग्यवती मी महाराष्ट्राची मराठी भाषेचा मुद्दा आणि मराठी वेशभूषेवर आधारित ही स्पर्धा पुणे येथे आयोजित करण्यात येणार आहे. तरी पुण्यातील तसेच पुणे परिसरातील जास्तीतजास्त तरुण युवतींनी व महिला या स्पर्धेत सहभागी व्हावे.” असे आवाहन त्यांनी केले.
 
दिग्दर्शक रामकुमार शेडगे म्हणाले, की  सौंदर्यवती ही स्पर्धा तरुण युवती व महिलांच्या कलागुणांना वाव देणारी असून त्यांच्यामध्ये नवचैतन्य निर्माण करणारी आहे. स्त्री वर्गाला सबलीकरण आणि बळकटीकरण त्याचबरोबर स्वतःच्या हक्काचं व्यासपीठ या स्पर्धेतून निर्माण होणार आहे.
 
यावेळी मॉडेल श्रद्धा दराडे नयनतारा ग्रुप, अंबिका पिट्टा, वैशाली शितोळे, योगिनी कोटे, अभिनेत्री मोनाली मोरे, कांचन कोळपकर,आकाश रणदिवे, सागर पतंगे,तेजस नाईकवाडी उपस्थित आदी उपस्थित होते. अशी माहिती द रॉयल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष नितीन झगरे यांनी दिली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading