संभाजी ब्रिगेड पुणे महापालिकेसह जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका लढणार – चंद्रशेखर घाडगे
पुणे:लोकांना आपलासा वाटणारा लोकांचा विश्वास असणारा बहजूनाच्या हितासाठी सदैव काम करणारे असा एकमेव पक्ष म्हणजे संभाजी ब्रिगेड पक्ष ठरलेला आहे. त्यामुळे आगामी 2022 पुणे महानगरपालिका, ,जिल्हा परिषद व पंचायत समिती तसेच नगरपरिषदेच्या निवडणूकीच्या सर्वच जागा लढवुन पूर्ण ताकतीने रिगणात उतरवणार आहोत. अशी माहिती पुण्यातील पत्रकार परिषदेत संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे यांनी दिली.
या पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष उत्तम कामठे, अविनाश मोहिते, मोहिनी रणदिवे, सचिन गायकवाड उपस्थित होते.
चंद्रशेखर घाडगे म्हणाले, पुणे हे सांस्कृतिक वारसा लाभलेले विद्येचे माहेर म्हणून ओळखले जाते. आपले पुणे निश्चितच सूजलाम सुफलाम करण्यासाठी संभाजी ब्रिगेड च्या माध्यमातून अनेक प्रश्न मागी लावण्यात आले आहेत.आणि यापुढेही
प्रयत्न असणार आहे. यामध्ये प्रामुख्याने मेट्रोचा प्रश्न असेल ,पुणे शहरातील कचऱ्याचा प्रश्न, सांडपाण्याचा प्रश्न गटार लाईन तसेच शिक्षणाचे प्रश्न असतील. वाहतुक कोंडी , रस्ता तसेच अतिक्रमण च्या नावाखाली गरीब अनाथ बेघर करणाऱ्यांना घरे उपलब्ध करून देणे .जिल्हा परिषद गटातील रस्त्यांचे काम शेतकऱ्यांना व्यावसायिकांना त्यांना जिल्हा परिषद मार्फत येणाऱ्या सुविधा पुरवणे हे सारे मूलभूत प्रश्न घेऊन संभाजी ब्रिगेड इथून पुढच्या काळामध्ये निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. असे चंद्रशेखर घाडगे यांनी सांगितले.
