Sunday, September 27, 2026
Latest NewsPUNE

Education- 66% पालक मुलांना शाळेत पाठवण्यास तयार

पुणे – करोनाच्या प्रादुर्भाव कमी झाल्यास शहरी भागांतील शाळा सुरू करण्यासाठी शासन हालचाली करण्यात येणार आहे. तत्पूर्वी, शाळा सुरू झाल्यास पुणे शहरातील जवळपास 66 टक्के पालकांनी मुलांना शाळेत पाठवण्यास होकार दर्शवल्याची बाब सर्व्हेक्षणातून समोर आली आहे.

एज्युटेक प्रमुख कंपनी “लीड’ने पालकांचे सर्वेक्षण करून त्यांचे मुलांना शाळेत पाठवण्यासंदर्भात मते जाणून घेतली आहेत. मेट्रो व नॉन-मेट्रो शहरांमधील इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या मुलांच्या 10 हजार 500 पालकांचे सर्व्हेक्षणकरण्यात आले.

मुलांचे आरोग्य व सुरक्षितता लक्षात घेत लीडच्या सर्वेक्षणाने निदर्शनास आणले की, 22 टक्के पालकांनी शालेय कर्मचाऱ्यांचे लसीकरण होण्याला अधिक प्राधान्य दिले. मेट्रो शहरांमधील 55 टक्के पालकांनी सोशल डिस्टन्सिंगला अधिक महत्त्व दिले आणि त्यानंतर हेल्थकेअर सुविधांना 54 टक्के पालकांनी प्राधान्य देण्यात आले. नॉन-मेट्रो शहरांमधील पालकांनी 52 टक्के क्रीडा व सोशल डिस्टन्सिंगला समान महत्त्व दिले.

मेट्रो व नॉन-मेट्रो शहरांमधील 70 टक्के पालकांनी सांगितले की, पालकांनी त्यांच्या मुलांच्या शिक्षणाकडे अधिक लक्ष दिले. मेट्रो शहरांमध्ये फक्‍त आईनेच मुलांचा अभ्यास घेण्याचे प्रमाण सर्वाधिक 21 टक्के होते.

सुमीत मेहता, सह-संस्थापक व सीईओ, “लीड” म्हणाले, 34 टक्‍के पालक मुलांना शाळेत पाठवण्यास तयार नाहीत. त्यांचे मतदेखील विचारात घेतले पाहिजे. शाळांना आवश्‍यक युटिलिटीज म्हणून महत्त्व दिले पाहिजे आणि पालकांनी सकारात्मक व खुल्या मनासह त्यांच्या मुलांना शाळेत पाठवले पाहिजे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading