Monday, August 3, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

प्रवीण दरेकर यांच्या विराेधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून पोलिसांत तक्रार दाखल

पुणे :  विधानपरिषदेचे विराेधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस हा रंगलेल्या गालाचा मुका घेणारा पक्ष आहे असे वक्तव्य केले हाेते. या विराेधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर आक्रमक झाल्या  असून त्यांनी दरेकर यांचे विराेधात सिंहगड राेड पाेलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून त्यानंतर पाेलीसांनी दरेकर यांच्यावर भादंवि कलम ५०९ नुसार गुन्हा दाखल केला आहे. 

चाकणकर यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रीय एकात्मेतला बाधा पाेहचवत राष्ट्रवादी काँग्रेसची बदनामी करुन व महिलांच्या विनयशीलतेला धाेका पाेहचविणारे वक्तव्य केले आहे. शिरुर येथे १३ सप्टेंबर राेजी आद्यक्रांतीकारक उमाजी नाईक यांचे २३० व्या जयंतीनिमित्त आयाेजित केलेल्या कार्यक्रमाचे भाषणात दरेकर यांनी जाणुनबुजून राष्ट्रवादी काँग्रेस हा रंगलेल्या गालाचा मुका घेणारा पक्ष आहे असे वक्तव्य केले आहे. 

लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात १४ सप्टेंबर राेजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे बातम्या प्रसारमाध्यमात येत हाेत्या. त्या पार्श्वभूमीवर दरेकर यांनी संबंधित विधान केले आहे  त्यामुळे त्यांनी केलेल्या विधानामुळे एक स्त्री म्हणून माझे मनास लज्जा उत्पन्न झाली आहे.  दरेकर यांनी केलेल्या वक्तव्यामुळे तमाम महिला वर्गाचे मनात लज्जा उत्पन्न हाेवुन महिलांच्या विनयशीलतेचा अपमान झालेला आहे. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading