Sunday, August 2, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

शेतकरी बचाव संयुक्त कृती समितीची 24 सप्टेंबरला जनता जागर निदर्शने तर 27 रोजी पुणे बंद व असंतोष दिवस

पुणे: केंद्र सरकारच्या निर्णय व धोरणामुळे पेट्रोल रु 110 वर चाललेले आहे. स्वयंपाकाचा घरगुती गॅस तर रु 1000 च्या जवळ पोहोचला आहे.बेरोजगारि प्रचंड वाढलेली आहे.बँका विमानतळ ,रेल्वे इतकच सागर अनेक कारखाने केंद्र सरकारने विकायला काढली आहेत देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात देशाला देशोधडीला लावणाऱ्या धोरणांविषयी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 24 सप्टेंबरला दुपारी 12 वाजता शेतकरी बचाव संयुक्त कृती समिती व राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शिवसेना व काँग्रेस यांच्याकडून निदर्शने केली जाणार आहेत. अशी माहिती पुण्यातील पत्रकार परिषदेत शेतकरी बचाव संयुक्त कृती समिती चे निमंत्रक नितीन पवार यांनी दिली.

या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे नगरसेवक अभय छाजेड, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रमेश कोंडे उपस्थित होते.

नितीन पवार म्हणाले, देशाच्या 75व्या स्वातंत्र्य वर्षात आपण पर्दापण केले आहे. यानिमित्ताने स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये शहीदाने दिलेल्या आपल्या प्राणाच्या बलिदानाची लोकांनी आपल्या घरावर नीखारे ठेवून केलेल्या त्यागाची आठवण निघणे हे स्वाभावीक आहे सध्या देशभर वेगळ्या वेगळ्या पातळीवर हे होत आहे. पण हे होत असताना स्वातंत्र्य ज्या कारणासाठी मिळाले त्याचे काय झाले? याचाही आढावा घेणे गरजेचे आहे. या पाशवभूमीवर 27 सप्टेंबरला असतोष दिवस पाळून देशाच्या सरकारला देशातील प्रश्नांविषयी जागे करणे . त्याच्या खालच्या बाजूने असून नागरिकांचे काम आहे त्यामध्ये सहभागी झाले पाहिजे असे आम्हाला वाटते तर नागरिकांनी त्यामुळे आपण 27 सप्टेंबर मध्ये सहभागी व्हावे असे शेतकरी बचाव संयुक्त कृती समिती संघटनेच्या वतीने जाहीर आवाहन नितीन पवार यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading