Friday, May 29, 2026
Latest NewsPUNE

कृष्णाई ज्ञान प्रतिष्ठानने महिलांच्या कष्टाला पाठबळ दिल्यामुळे गरजू महिलांना प्रगतीचा मार्ग सापडला – गणेश बिडकर

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी पुणे शहर महिला आघाडी आणि कृष्णाई ज्ञान प्रतिष्ठान आणि ड्राईट संंस्थेने घरी बसून लघु उद्योग करणाऱ्या सभासद महिलांना केलेल्या कामाचे पेमेंट चेक वाटप पुणे मनपा सभागृह नेता आणि नगरसेवक गणेशजी बिडकर यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी आपल्या भाषणात गणेश बिडकर म्हणाले ” सुवर्णा भरेकर यांच्या कृष्णाई ज्ञान प्रतिष्ठानने महिलांच्या कष्टाला पाठबळ दिल्यामुळे गरजू महिलांना प्रगतीचा मार्ग सापडला आहे ” असे आपल्या भाषणात सांगितले. यानंतर सुवर्णा भरेकर यांनी कृष्णाई ज्ञान प्रतिष्ठान वतीने महीलांसाठी विविध व्यवसाय आणि रोजगार याबाबत उपक्रम राबविले जातात असे सांगितले.
या कार्यक्रमात कृष्णाई ज्ञान प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सुवर्णा भरेकर, ड्राईट कंपनीचे रोहित दामोदर, प्रथमेश संत, आणि स्वप्निल, तसेच मातोश्री संस्थेच्या अश्विनी वाघ, उपस्थित होते. कृष्णाई ज्ञान प्रतिष्ठान आणि मर्दानी महिला बचत गटाच्या महिला सभासदांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले. ह्या मधे विद्या भागवत. स्वाती रावळे, नंदा तुपे, रत्ना जगताप, माधुरी अंबिके, वंदना दवे या महिलांचा मोलाचा वाटा होता.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading