Pune – गेल्या 24 तासात नवीन कोरोनाचे 159 रुग्ण
पुणे: शहरामध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मागील काही दिवसांपासून नवीन रुग्णांच्या तुलने बरे होण्याऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त होते. परंतु आज रुग्णांची कमी असून दोनशे च्या खाली आज रुग्ण सापडले आहेत. पुणे शहरामध्ये गेल्या 24 तासात 159नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 130रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 99हजार 618इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 89हजार 014इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 6रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 4तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 2रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 9008जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.शहरामध्ये सध्या 1596रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. त्यापैकी 180रुग्ण गंभीर आहेत, आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रांवर 6187 स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
