Thursday, November 19, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

ॲमिनिटी स्पेस भाड्याने दिल्या तर 1700 कोटी चा महसूल महापालिकेला मिळेल – महापौर मुरलीधर मोहोळ

पुणे: ॲमिनिटी स्पेस च्या विक्रीची  शहरात चर्चा आहे.भाड्याने ॲमिनिटी स्पेस  देण्याचा ठराव स्थायी समिती ने आणला आहे. उद्या होण्याऱ्या  स्थायी समिती च्या सभेत या बदल चर्चा करणार आहोत. आम्ही भारतीय जनता पार्टी चे काम आपल्या समोर आणत आहोत .ॲमिनिटी स्पेस च्या 270 जागा आम्ही या विकायला काढल्या आहेत असा आरोप विरोधी पक्षा ने आमच्यावर आरोप केला आहे.खरे तर ॲमिनिटी पेस च्या जागा आम्ही भाड्याने देवू शकतो.जर ॲमिनिटी पेसच्या जागा जर भाड्याने दिले तर 1700 कोटी चा महसूल महानगरपालिकेला मिळेल .असे महापौर पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ याचा आज पुणे महानगरपालिके तर्फे वार्तालाप आयोजित करण्यात आला होता त्या वेळी ते बोलत होते.

या वार्तालापाला स्थायी समिती चे अध्यक्ष हेमंत रासने उपस्थित होते. ॲमिनिटी स्पेस  च्या जागा भाड्याने दिले तर त्या जागी उद्याने,मॉल्स,शाळा, वाहन पार्किंग  ऊभारण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्हाला पुण्यातील सामाजिक संस्था या येवून भेटल्या त्याचा पण पाठिंबा आहे.त्याचे पण ॲमिनिटी पेस बदल आम्ही विचार ऐकून घेतले. आम्हाला सगळ्यांना विश्वासात घेवून आम्हाला हा ठराव आम्हाला मंजूर करायचा आहे.कोणाचेही मन दुखवून आम्हाला ठराव मंजूर करायचा नाही.
असे मोहोळ म्हणाले.

Leave a Reply