एचपी प्रीमियर लीग पुरुष गटाच्या क्रिकेट स्पर्धेत पीवायसी हिंदू जिमखाना, केडन्स संघाचा सलग दुसरा विजय
पुणे : हेमंत पाटील(एचपी) प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एचपी प्रीमियर लीग पुरुष गटाच्या क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत पीवायसी हिंदू जिमखाना व केडन्स क्रिकेट अकादमी या संघांनी आपली विजयी मालिका कायम ठेवत सलग दुसरा विजय नोंदविला.
डेक्कन जिमखाना क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत पहिल्या सामन्यात हर्षद खडीवाले(35 धावा व 3-26) याने केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर केडन्स क्रिकेट अकादमी संघाने डेक्कन जिमखाना संघाचा 56 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना केडन्स क्रिकेट अकादमी संघाने 20षटकात 9बाद 175धावाचे आव्हान उभे केले. यात हर्षद खडीवाले 35, रोहित मोटवानी 35, अथर्व काळे 19 यांनी धावा काढून संघाला सुरेख सुरुवात करून दिली. त्यानंतर हर्षल काटेबे 37धावा व सिद्धेश वरघंटेने 17धावा यांनी पाचव्या गड्यासाठी 25 चेंडूत 52 धावांची भागीदारी करून संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली.
डेक्कन जिमखानाकडून आशय पालकर 3-33, पियुश साळवी 3-26 यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले. या आव्हानाला सामोरे जाताना डेक्कन जिमखाना संघाचा डाव 16.2षटकात 119धावावर संपुष्टात आला. यामध्ये तुषार श्रीवास्तव 43, शुभम नागवडे 36, अभिषेक ताटे 14 यांनी दिलेली लढत अपुरी ठरली.केडन्स संघाकडून समद फल्ला 3-14, अक्षय वाईकर 3-16, हर्षद खडीवाले 3-26) यांनी अफलातून गोलंदाजी करत डेक्कन जिमखाना संघाला 119 धावांवर रोखले व संघाला 56 धावांनी विजय मिळवून दिला.सामन्याचा मानकरी हर्षद खडीवाले ठरला.
लोहगाव येथील वीरांगना क्रिकेट मैदानावरील दुसऱ्या सामन्यात दिव्यांग हिंगणेकर(40धावा व 1-10)याच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर पीवायसी हिंदू जिमखाना संघाने युनायटेड स्पोर्ट्स क्लब संघाचा 45 धावांनी पराभव करून आपली विजयी घौडदौड कायम ठेवली.
