Friday, May 29, 2026
Latest NewsPUNE

स्थायी समिती अध्यक्ष आणि आयुक्तांमध्ये मुख्य सभेत आमने – सामने

पुणे:वित्तीय समिती बरखास्त करून अंदाजपत्रकाची 100 टक्के अंमलबजावणी करण्याच्या मागणीवरून स्थायी समिती आणि आयुक्तांमध्ये झाला ‘ कोल्ड वॉर ‘ वरून विरोधकांनी आयुक्तांना फिल्मी गाण्याचे  मुखडे ऐकून विनंती केली. तर सत्ताधाऱ्यांनी थेट आंदोलनाचा इशारा देत निधी नसल्याने रखडलेल्या कामांची यादीच सर्वसाधारण सभेत वाचून दाखवत हतबलता व्यक्त केली.

अंदाजपत्रकाची 100 टक्के अंमलबजावणी करन्यावरून स्थायी समिती आणि  आयुक्तांमध्ये वाद सुरू आहे. निवडणुकीच्या तोंडावर कामे झाली पाहिजेत यासाठी स्थायी समिती आग्रही आहे. तर उत्पन्न, कोरोनाची संभाव्य तिसरी लाट लक्षात घेऊन खर्चाचे नियोजन करण्याची भुमिका आयुक्तांनी घेतली आहे. यामुळे तीन आठवड्यांपूर्वी स्थायी समिती अध्यक्षांनी आयुक्तांचा निषेध करत सभा तहकूब केली. त्यामुळे आयुक्तांनीही पुढील दोन्ही स्थायी समितीकडे पाठ फिरवली. 

दरम्यान आज झालेल्या सर्वसाधारण सभेत शिवसेनेचे नगरसेवक बाळा ओसवाल यांनी आयुक्तांना ‘ हा रुसवा सोडा आयुक्त बजेट उपलब्ध करून घ्या ना ‘ हे पद्य स्वरूपात गाऊन आयुक्तांना बजेट वापरण्यास परवानगी देण्याची विनंती केली. तर काँग्रेस गटनेते आबा बागुल यांनी ‘ छोडो कल की बाते, कल की बात पुराणी ‘ असा मुखडा गात आयुक्तांना चुचकारन्याचा प्रयत्न केला.

भाजपच्या नगरसेविका राजश्री काळे यांनी प्रभागातील मूलभूत कामे रखडलीत आयुक्तांनी बजेट न दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला. हरिदास चरवड यांनी कामे होत नसल्याने रस्त्यावर फिरता येत नाही. आदित्य माळवे यांनी यावेळी त्यांच्या प्रभागातील रखडलेल्या छोट्या कामांची यादी वाचून दाखवली. आरती कोंढरे यांनी पालिकेचे उत्पन्न चांगले असताना अशा पद्धतीने कामे अडवणे हा जनमताचा अपमान आहे, लोकप्रतिनिधींना न्याय द्यावा अशी मागणी केली. मंजुषा नागपुरे, विशाल धनवडे, राजाभाऊ लायगुडे , सिद्धार्थ धेंडे, गणेश ढोरे, सुभाष जगताप, वसंत मोरे आदींची यावेळी भाषणे झाली. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading