माजी नगरसेवक सुदर्शन मुदलियार यांचे निधन
पुणे : माजी नगरसेवक आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुदर्शन मुदलियार यांचे वृद्धापकाळाने रविवारी निधन झाले. ते ९२ वर्ष वयाचे होते.
कै. मुदलियार यांच्या पार्थिवावर सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी माजी आमदार उल्हास पवार, नगरसेवक विशाल धनावडे, काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ता रमेश अय्यर, चंद्रकांत मिठापल्ली आणि केईएम हॉस्पिटलचे अधिकारी यांनी कै. मुदलियार यांना श्रद्धांजली वाहिली.
कै. मुदलियार १९५६ ते ६१पर्यंत पुणे महापालिकेचे सभासद होते. रास्ता पेठ वॉर्डमधून पुणे महापालिकेवर अपक्ष म्हणून निवडून आले होते.केईएम रुग्णालय, उंटाड्या मारुती देवस्थान आणि श्री निवडुंग्या विठोबा देवस्थान अशा संस्थांचे ते विश्वस्त होते. या संस्थांच्या माध्यमातून रास्ता पेठ आणि परिसरात त्यांनी प्रदीर्घ काळ सामाजिक कार्य केले. सरदार एस.सी. मुदलियार यांचे ते नातू होत.
