Wednesday, November 18, 2026
ENTERTAINMENTLatest News

दसऱ्याच्या मुहूर्तावर तापसी पन्नूचा ‘रश्मी रॉकेट’ होणार प्रदर्शित

वेगवेगळे विषय आणि उत्तम अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप टाकणारी अभिनेत्री तापसी पन्नू (Tapasee Pannu) हिचा ‘रश्मी रॉकेट’ (Rashmi Rocket) हा चित्रपट प्रदर्शनासाठी तयार आहे. येत्या दसऱ्याला म्हणजेच 15 ऑक्टोबरला ‘झी5’वर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती रॉनी स्क्रूवाला यांच्या आरएसवीपी आणि मँगो पीपल मीडियाद्वारे करण्यात आली आहे. तर चित्रपासाठी नंदा पेरियासामी, अनिरुद्ध गुहा आणि कनिका ढिल्लों यांनी लेखन केले आहे. या चित्रपटात तापसीसह सुप्रिया पाठक, अभिषेक बनर्जी, प्रियांशु पेन्युली आणि सुप्रिया पिळगांवकर देखील मुख्य भूमिकेत असणार आहेत.

एका एथलेटिकच्या जीवनावर ‘रश्मी रॉकेट’ ही एका छोट्या गावातल्या तरुण मुलीची कथा आहे. मात्र, तिच्याकडे एक अविश्वसनीय अशी शक्ती आहे. आकर्ष खुराना यांच्याद्वारे दिग्दर्शित ‘रश्मी रॉकेट’, नंदा पेरियासामी यांच्या मूळ कथेवर आधारित आहे. यामध्ये ‘रश्मी रॉकेट’ला आपले स्वप्न प्रत्यक्षात आणण्याची आणि स्पर्धेत व्यावसायिक रूपाने सहभागी होण्याची संधी मिळते. मात्र, तिला हेही जाणवते की, फिनिश लाईन आणि धावणे यामध्ये अनेक संकटे आहेत. अखेरीस ही एथलेटिक स्पर्धा तिच्या व्यक्तिगत लढाईत रूपांतरित होते.

 

 

Leave a Reply