सिहंगड रोड वरील उड्डाणपूलाचे भूमिपूजन 24 सप्टेंबर रोजी नितीन गडकरी यांच्या हस्ते
पुणे:पुणे महानगरपालिकेच्या प्रयत्यांनातुन सिहंगड रोड वरील प्रस्तावित नवीन उड्डाणपूलाचे भूमिपूजन 24 सप्टेंबर ला केंद्रीय रस्ते महामार्ग विकासमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सकाळी 10.30 वाजता होणार आहे.अशी माहिती पुण्यातील पत्रकार परिषदेत महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
या पत्रकार परिषदेला भाजपचे माजी आमदार योगेश टीळेकर, स्थायी समिती चे अध्यक्ष हेंमत रासने उपस्थित होते. महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले,महानगरपालिकेच्या आथिक प्रयत्नातून 123 कोटी रुपये खर्च करून उभारलेल्या उड्डाणपूलाच्या भूमिपूजन होत आहे. यांचा आम्हाला खूप आनंद होत आहे. या उड्डाणपूलाच्या भूमिपूजनाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा उपसभापती व शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे,भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील,महानगरपालिकेतील नगरसेवक उपस्थित राहणार आहेत.असे मोहोळ म्हणाले.
