Wednesday, November 18, 2026
ENTERTAINMENTLatest News

एण्‍ड टीव्‍हीवरील मालिका ‘घर एक मंदिर’मध्‍ये दिसणार समीर धर्माधिकारी

‘घर एक मंदिर – कृपा अग्रसेन महाराज की’मध्ये गेंदाचा (श्रेनू पारिख) वरूण अग्रवालसोबत (अक्षय म्‍हात्रे) विवाह झाल्‍यानंतर नाट्यमय क्षण घडतो. गेंदाचा अग्रसेन महाराज व त्‍यांच्‍या विचारसरणीवरील निष्‍ठेला तडा जातो. ती त्‍यांची मूर्ती मंदिरात परत ठेवते. तिच्‍यामधील निष्‍ठा पुन्‍हा जागृत करण्‍यासाठी आणि ती सामना करत असलेल्‍या आव्‍हानात्‍मक स्थितीमध्‍ये तिला मार्गदर्शन करण्‍यासाठी अग्रसेन महाराज सामान्‍य व्‍यक्‍तीप्रमाणे वेषांतर करत धरतीलोकवर येतात. या सामान्‍य व्‍यक्‍तीचे नाव म्हणजे ‘महाराज’. ही भूमिका साकारली आहे समीर धर्माधिकारी यांनी.

आपल्या भूमिके बद्दल समीर धर्माधिकारी म्‍हणाले, ”महाराज उत्‍साही, बुद्धिमान व प्रेमळ व्‍यक्‍ती आहे. त्‍याच्‍या शिरपेच्‍यात अनेक तुरे आहेत. त्‍याला स्‍वयंपाक, गायन, फुले व घरांची सजावट करायला येते. महाराजमध्‍ये विशिष्‍ट स्थिती व लोकांशी एकरूप होण्‍याची क्षमता आहे, ज्‍यामुळे त्‍याला लोकांची मने जिंकण्‍यास मदत होते. तो थेरपी म्‍हणून विविध प्रकारच्‍या फुलांचा वापर करून अनेक आरोग्‍यविषयक आजार बरे करू शकतो. या सर्व बाबी या भूमिकेला अत्‍यंत रोचक बनवतात. मागील काही व अलिकडील भूमिका अत्‍यंत वास्‍तववादी राहिल्‍या आहेत. पण ही सामान्‍य व्‍यक्‍तीची भूमिका असली तरी साधीभोळी, प्रभावी व रोचक आहे. एकाच भूमिकेमध्‍ये दैवी व सामान्‍य व्‍यक्‍ती अशी दोन रूपे साकारण्‍याची संधी निश्चितच अद्भुत आहे. महाराजच्‍या प्रवेशाचा गेंदाच्‍या जीवनावर काय परिणाम होतो आणि तो विविध स्थितींमध्‍ये तिला कशाप्रकारे मदत करतो हे पाहणे रोमांचक असणार आहे.

पुढे बोलताना समीर धर्माधिकारी म्‍हणाले, हे सुरेख नाते या कथेचा मूळ गाभा ठरेल. गेंदाच्‍या निष्‍ठेला तडा जातो, तेव्‍हा अग्रसेन महाराज तिचे तत्त्वज्ञानी, मार्गदर्शक व मित्र म्‍हणून ‘महाराज’च्‍या रूपात धरतीलोकवर येतात आणि तिचा विश्‍वास पुन्‍हा जागृत करतात. जग नेहमीच तुमच्‍या विश्‍वासाला तडा देण्‍याचा प्रयत्‍न करेल, पण तुम्‍ही तुमच्‍या विश्‍वासावर ठाम राहिले पाहिजे. महाराज गेंदाच्‍या जीवनामध्‍ये अनेक ट्विस्‍ट्स आणणार आहे आणि अग्रसेन महाराज यांच्‍या विचारसरणीवरील तिची निष्‍ठा पुन्‍हा जागृत करेल.”

 

 

Leave a Reply