Thursday, November 19, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

सोमय्यांचा फक्त वापर,खरे मास्टरमाईंड चंद्रकांत पाटील, हसन मुश्रीफांचा आरोप

मुंबई :  भाजप कोल्हापूरमधून भुईसपाट झाल्यामुळे माझ्यावर आरोप करण्यात येत आहेत. किरीट सोमय्यांचे आरोप बिनबुडाचे असून फक्त टूल म्हणून भाजपने सोमय्यांचा वापर केला आहे. खरे मास्टरमाईंड भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील असल्याचा आरोप  हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत केला, तसेच  खोटे आरोप करुन बदनामी केली असल्यामुळे १०० कोटी फौजदारी अब्रुनुकसानीचा दावा तयार होत आहे. परंतु अजून ५० कोटींचा दावा करणार असल्याचे हसन मुश्रीफ यांनी सांगितले. 

सोमय्यांच्या आरोपांना उत्तर देताना हसन मुश्रीफ म्हणाले  की, किरीट सोमय्यांनी केलेल्या आरोपांमागे भाजपचे षडयंत्र आहे. चंद्रकांत पाटील यामागील मास्टरमाईंड आहेत.  भाजप आज कोल्हापूर जिल्ह्यात ते शून्य आहेत. जिल्हापरिषद, नगरपालिकात, जिल्हा मध्यवर्ती बँक ताब्यात नाही. मार्केट कमिटी ताब्यात नाही. यामुळे सातत्याने दिल्लीमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची उचलबांगडी करणार होते. परंतु केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मैत्रीमुळे ते वाचले आहेत. कोल्हापूरमध्ये होणारा सुपडा साफ हा त्यांचे अपयशाचे कारण आहे. 

सोमय्या कागद काढतात आणि फडणवीस यांच्याकडे घेऊन जातात. फडणवीस सांगतात त्यांच्यावर कारवाई केली जाते. राजकीय कारणामुळे फडणवीसांनी माझ्यावर कारवाई करण्यास सांगितले असेल असे हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. चंद्रकांत पाटील यांनी पुरुषार्थ प्रमाणे वागावे, असे आरोप करुन, कोणाचातरी वापर करुन बदनामी करुन काहीही मिळणार नाही. सगळे आरोप खोटे आहेत बिनबुडाचे आहेत. 

सोमय्यांनी केलेला आजचा आरोप बिनबुडाचा आणि खोटा आहे. सोमय्यांची सीएची पदवी खोटी आहे का काय? असं वाटत आहे. आजचा आरोप खोटा असून त्यांनी अजूनही अभ्यास करावा, त्यांच्याकडे सीए पाठवतो आणि मग त्यांना समजेल की हसन मुश्रीफ कसा माणूस आहे.

सोमय्यांनी आरोप केल्यात्याबदद्ल माझी माफी  मागावी, अप्पासाहेब नलावडे कारखान्यावरुन आरोप केला आहे. त्यात ब्रीक्स इंडिया कंपनीसोबत माझ्या जावयाचा काहीही संबंध  नाही. ब्रीक्स इंडिया कंपनी ४४ लाख शेअर कॅपिटलची आहे. एसयू ही शेअर कंपनी नाही ती महाराष्ट्राची कंपनी आहे. ती सुद्धा १ लाख रुपये शेअर कॅपिटलची आहे. मग १०० कोटींचा घोटाळा होईल कसा ?

कोल्हापूर मध्यवर्ती जिल्हा बँकेने निविदा काढली नाही. बँकेचे या कारखान्याला कर्ज नव्हते, शासनाने २०१२-१३ साली हा कारखाना चालवायला दिला होता. १० वर्षांच्या करारानुसार हा कारखाना दिला होता. ही कंपनी २०२० ला दिली असल्याचे सांगितले. २०२० ला ही कंपनी सोडली होती. १० वर्षांसाठी ४३ कोटींना घेतला होता. २ वर्षांपासून तोट्यात असल्यामुळे या कंपनीने कारखाना सोडला होता. यामुळे सोमय्यांनी अजून अभ्यास करावा, कारखाना सोडल्याची ऑर्डर आहे. महाराष्ट्राच्या शासनाच्या परवानगीने हा कारखाना २०१२ मध्ये १० वर्षांच्या सह्योगी तत्वावर घेतला होता. २ वर्षांपुर्वी फार मोठा तोटा येत होता यामुळे कारखाना सोडून संचालक मंडळाच्या ताब्यात दिला आहे. 

Leave a Reply