कराड – हसन मुश्रीफ यांचा तिसरा गैरव्यहवार बाहेर काढणार – किरीट सोमय्या
कराड : गडहिंग्लज कारखान्यातही 100 कोटींचा गैरव्यहवार झाला आहे, असा आरोप करत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा तिसरा गैरव्यहवार बाहेर काढणार असल्याचे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सांगितले आहे. याची चौकशी व्हायला हवी. पुन्हा एकदा आपण भेटणार इथे किंवा कोल्हापूरला, असेही त्यांनी सांगितले आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या कोल्हापूरला जाण्यापासून रोखण्यात आले असून कराडमध्ये सोमवारी पहाटे पोलिसांनी त्यांना उतरवले. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत त्यांनी ठाकरे सरकारवर कडाडून टीका केली. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर सोमय्या यांनी 127 कोटींच्या गैरव्यहावरचा आरोप केला. त्यासंबंधित पाहणीसाठी सोमय्या मुंबईवरून रविवारी महालक्ष्मी एक्सप्रेसने कोल्हापूरला निघाले होते. दरम्यान कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यानी सोमय्यांना कायदा- सुव्यवस्थेचे कारण देत जिल्हाबंदी केली होती. सोमय्यांना ठाणे व कल्याण स्टेशनवर अडवण्याचा प्रयत्न झाला होता. दरम्यान कोल्हापूर येथेही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. सोमवारी पहाटे कराडमध्ये त्यांना अखेर रोखण्यात आले.
हसन मुश्रीफ व कुटुंबीयांनी 127 कोटींचा गैरव्यहवार केला, असा आरोप किरीट सोमय्यांनी पत्रकार परिषदेत केला. तसेच मला हे गैरव्यहवार उघड करण्यास विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे, असेही किरीट सोमय्या म्हणाले.
“मी उदाहरण देतो. २०२० मध्ये कोणत्याही प्रकारे ट्रान्सपरंट बिडींग न होता, हा कारखाना ब्रिक्स इंडिया प्रा लि या कंपनीला दिला. या कंपनीला साखर कारखाना चालवायाचा अनुभव नाही. पण या कंपनीला का कारखाना दिला हे शरद पवारांना माहिती आहे. कारण मतीन हसीन मंगोली हे हसन मुश्रीफ यांचे जावई ते या ब्रिक इंडिया बेनामीचे मालक आहेत. या कंपनीत ७१८५ शेअर एस यू कॉर्पोरेषन प्रायव्हेट, ९९८ मतीन हसीनचे, तर ९९८ गुलाम हुसेनचे आहेत. म्हणजे परत सरसेनापती कारखान्यासारखे ९८ टक्के शेअर एस यू कार्पोरेशन या बेनामी कंपनीकडे. म्हणजे हसन मुश्रीफ यांनी २०१९-२० मध्ये ग्रामविकास मंत्री झाल्यानंतर जो गैर मार्गाने पैसा कमावला, तो इथे पास केला आहे.”
किरीट सोमय्या म्हणाले, हसन मुश्रीफ यांनी 127 कोटी आपल्या कंपनीत मनी लाँडरिंगचे आले त्याचा हिशेब अजून का दिला नाही. शरद पवार ही तुमची व्यूवरचना आहे का? सरसेनापती घोरपडे कारखान्यात ९८ कोटी हे बोगस कंपन्याद्वारे भ्रष्टाचाराद्वारे आणले. मुश्रीफ परिवारातर्फे दोन कोटी आहे, बाकी सगळा पैसा बोगस कंपन्याद्वारे आहे. आपला आणि अप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज सहकारी साखर कारखाना याचा संबंध काय? हसन मुश्रीफ यांचा दुसरा घोटाळा. मुश्रीफ परिवाराने अप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज सहकारी साखर कारखान्यात १०० कोटींचा घोटाळा केला. यामध्येही शेल कंपन्यांद्वारे पैसे उभारले. बोगस अकाऊंट उघडून कॅश टाकायचे आणि पैसे घ्यायचे, १०० कोटी रुपये घेतले. गडहिंगल्ज कारखान्यातील घोटाळ्याबाबत ईडी आणि इन्कम टॅक्सकडे उद्या तक्रार करणार, असंही सोमय्या यांनी सांगितलं.
